नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

सद्गुरु गजानन मंदिर सेवाश्रम नागलवाडीत शिवशंकरभाऊं पाटील यांना श्रद्धांजली

श्री सद्गुरु गजानन महाराज सेवाश्रम नागलवाडी यांच्या वतीने आज ध्यान कक्षामध्ये शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अजय निलदावार यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली

सद्गुरु गजानन मंदिर सेवाश्रम नागलवाडीत शिवशंकरभाऊं पाटील यांना श्रद्धांजली. नागपूर : दिनांक ९ ऑगस्ट :- झिरो मॉईल ते नागलवाडी २० किलोमीटर अंतरावरील श्री सद्गुरु गजानन महाराज सेवाश्रम नागलवाडी यांच्या वतीने आज ध्यान कक्षामध्ये शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अजय निलदावार यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला असून त्यांनी शिवशंकर पाटीलां च्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लगेच भाऊंच्या जीवनाविषयी बोलतांनी महत्त्व समजावून सांगितले की, भाऊंच्या निधनाची बातमी कळताच नागपूर शहरांच्या गजानन भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला.भाऊंना अचानक हृदय विकाराचा झटका आला त्यामध्ये त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 82 होते. या कार्यक्रमास भाऊंच्या विषयी निदलावार यांनी भाऊंचा मागील इतिहासा बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांचा जन्म 12 जानेवारी 1940 रोजी झाला. भाऊ जेव्हा 18 वर्षाची होते तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आणि मंदिराचीही देखभाल करत होते. त्यांनी पन्नास वर्ष मंदिराची सेवा केली. परंतु राजकारणात असतानी मंदिराकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एकच जबाबदारी सांभाळायची आहे ते म्हणजे सेवा ! गजानन महाराजांची सेवा ... त्यांनी ठाम निर्णय घेऊन राजकारणाचा कायमचा त्याग केला. संत गजानन महाराजांच्या विषयी ते दोन शब्द बोलले की, संत गजानन महाराज हे शेगावला अदृश्य रूपात ऐन तारुण्यात वयाच्या 18 व्या वर्षी, 23 फेब्रुवारी 1878 मध्ये प्रकट झाले. त्यानंतर त्यांना एकच भक्त भेटला तो म्हणजे शिवशंकर भाऊ पाटील. विश्वस्त शिवशंकर भाऊंनी 1908 साली शेगावच्या मंदिराची स्थापना केली. भाऊंची भक्ती अपार , अनंत असून त्यांनी फक्त संत गजानन महाराज व परमहंस रामकृष्ण यांची सदैव सेवा केली. आणि शेगावात आनंद सागर ची रचना केली. इंजिनीरिंग कॉलेज उभे केले. भाऊंचे शिक्षण फक्त दहावी पर्यंत होते. परंतु संत गजानन महाराजांच्या कृपेने त्यांनी खूप मोठे मॅनेजमेंट उभे केले. त्यावेळेस अनेक लोकांना, गजानन भक्तांना एकत्रित करून सेवा करा. सेवेकरिंना 100 गावांमधून निवडलं व महाराजांची सेवा करा असं सांगत भाऊंनी खूप मोठे भावभक्तीने सेवा करणे सुरू केले. भक्तांना सांगायचे खोटं बोलायचं नाही. भाऊंनी अनेक भक्तांना मदत करून सेवा केली आणि भक्तांचे 42000 ऑपरेशन घडवून आणलेत. त्यांनी अनेक प्रकल्पही उभारले. भाऊंच राहणीमान साध भोळ होतं. त्यांच्या अंगावर पांढराशुभ्र कुर्ता, पांढरेशुभ्र धोतर, डोक्यात पांढरी गांधी टोपी, गळ्यामध्ये मफलर अशा वेशभूषेतील भाऊ आयुष्यभर साधेपणाने जगले. कोट्यवधी रुपयांची सेवा प्रकल्प पूर्णत्वास नेले. गजानन महाराजांप्रती असलेली निस्सीम भक्ती आणि श्रद्धेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण दिसून येते. भाऊं गोरगरिबांची सेवा निस्वार्थ, सेवानिष्ठेने करणारे आज आपल्यापासून दूर गेले परंतु आजही ते आपल्या हृदयात आहे हे विसरू नका..... याप्रसंगी संजय देशमुख, राजू पुजारी, अजय निदलावार, अनिल शर्मा, दिलीप चौधरी, प्रमोद भाकरे, देवराव प्रधान तसेच सेवाश्रम गजानन मंदिराचे ट्रस्ट पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेश कुलकर्णी यांनी केले तर आभार दिलीप चौधरी यांनी मानल.(दि.09ऑगष्ट 2021)