नागपूर,दिनांक. 1 ऑगष्ट 2026 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने श्री. प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर व श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दिक्षाभूमी चौक येथील पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनाचे आयोजन करुन श्री. प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी ईशा भूते, सहाय्यक लेखाधिकारी, श्रीमती अनामिका बाराहाते, श्री. दिपक कुसरे, श्री. मनोहर उचे, श्रीमती छाया बागडे, श्रीमती निलोफर अली, श्री.दिनेश सुखदेवे, श्रीमती श्रीमती आरती सुखदेवे, श्रीमती अर्चना सातघरे, श्रीमती सारीका बोरकर, श्रीमती जयश्री धवराळ, श्रीमती प्रिती भांगे, श्री. गणेश बच्छे, हेमंत खवशी, विवेक दांडेकर, श्री विवेक गजभिये, श्री. गजानन शेळके, श्री. अमित कांबळे, श्री. चंदन त्रिमले, श्रीमती सुहानी कोवे, श्रीमती प्रतिभा डागोर,श्री. वैभव भारती, लकी गाडबैल, गणेश
ठाकरे, हितेश शहारे, कोमलचंद बारापात्रे, सचिन मोहाडीकर, तसेच प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.