नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

वाल्मिकी सुदर्शन समाजाला समतेची आवश्यकता आहे

आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने संत सुदर्शन महर्षी यांच्या जयंतीनिमित्त काँस्टाईब कर्मचारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भोला बढेल, आंविमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, पदाधिकारी नामदेवराव निकोसे

नागपूर दि.19 नोव्हेंबर:- वाल्मिकी सुदर्शन समाजाला समतेची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता संत सुदर्शन महर्षी यांच्या रूपात आपल्या घरोघरी विराजमान आहे. कारण संत सुदर्शन महर्षी हे समते चे पहिले प्रतिक होते. असे प्रतिपादन आंबेडकरी विचार मोर्चा प्रणित आंबेडकरी सुदर्शन वाल्मिकी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष बढेल यांनी व्यक्त केले. आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने संत सुदर्शन महर्षी यांच्या जयंतीनिमित्त काँस्टाईब कर्मचारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भोला बढेल, आंविमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, पदाधिकारी नामदेवराव निकोसे, अँड, सुरेश घाटे, देवेंद्र बागडे, नगरसेवक विजय चुटेले, कवि तन्हा नागपूरी, घनश्याम डकाहा, यांनी महर्षींच्या जिवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुदादा पांजरे, तर सुत्र संचालन प्रा. रमेश दुपारे यांनी तर आभार प्रदर्शन मामासाहेब मेश्राम यांनी मानले. याप्रसंगी विश्ववनाथ धोटे, रोहित बढेल, विशांत बढेल, सुमित हाटे, शालिक बांगर, हंसराज उरकुडे, मनोहर इंगोले, माया आढाव, अर्पणा रंगारी, सुनिता सोमकूवर, हमिदा खान, तुकाराम गेठे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.(दि.1911/2021)