नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूर जिल्ह्यात सेवा सुशासन गरीब कल्याण पंधरवाडा साजरा करणार

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची 8 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त नागपुर जिल्हयात सेवा, सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा साजरा करणार-भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ‍गजभिये यांच्या नेतृत्वात

नागपूर दिनांक:-3 मे, मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची 8 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त नागपुर जिल्हयात सेवा, सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा साजरा करणार-अरविंद ‍गजभिये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची 8 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त नागपुर जिल्हयात 30 मे ते 14 जून या कालावधीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ‍गजभिये यांच्या नेतृत्वात सर्व सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील व 20 मंडळांतील सर्व पदाधिकारी सहभागी होणार असुन 15 दिवसात पदाधिकारी व कार्यकर्ते 75 तास जनसंपर्क कार्यक्रमात योगदान देतील. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या नेतृत्वात समाजातील गरीब, शोषित, वंचित, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या कल्याणासाठी अनेक कामे झाली आहेत. म्हणूनच माननीय पंतप्रधानांच्या लोकप्रिय, निर्णायक, त्यागशील आणि तपस्वी नेतृत्वावर विश्वास ठेवून गरीब, शेतकरी आणि संपूर्ण देश आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभा आहे.माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी दृढ निश्चयाने काम करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जनसंपर्क करून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांची चर्चा करून जनजागृती करणार आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवड्यात 75 तासांच्या जनसंपर्क अभियानात प्रत्येक गावात, वॉर्डातून, घरोघरी संपर्क प्रस्थापित करून भाजपचे कार्यकर्ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षातील कामगिरी आणि गरीब कल्याणाच्या विविध योजना, उपलब्धी यांची चर्चा करणार आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवाडा अंतर्गत विविध रॅलीही काढण्यात येणार आहेत. जनसंपर्क अभियानात किसान चौपाल, महिला संमेलन, एससी-एसटी संमेलन यासह विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी एका विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करून भाजप किसान मोर्चा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याची चर्चा करणार आहे. महिला मोर्चाचा कार्यक्रम तयार करून भाजप महिलांमध्ये जाऊन माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशात महिला सक्षमीकरणाचे काम कसे झाले आहे याची माहिती देणार आहे. अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने समाजात जाऊन अनुसूचित जातींशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोर्चाचे कार्यकर्ते अनुसूचित जातीच्या वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांना भेटतील आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे पंचतीर्थ कसे बांधले ते समजावून सांगतले. गेल्या 70 वर्षात कोणी केले नाही. असे काम झाले आहे. भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे कार्यकर्ते अनुसूचित जमाती समाजामध्ये जाऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, त्या उत्पादनांना MSP अंतर्गत कसे आणले आहे हे सांगतील. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याबद्दल बोलतील. भाजप ओबीसी मोर्चा समाजातील ओबीसी समाजामध्ये जाऊन त्यांना सांगेल की, सध्या केंद्र सरकारमध्ये ओबीसी समाजाचे 27 मंत्री आहेत. तसेच त्यांना सांगितले जाईल की, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पखवाडा अंतर्गत जिल्हा भाजपा ची 33 पदाधिका-यांची एक टिम प्रदेश भाजपा महामंत्री मा.चंद्रशेखरजी बावनकुळे जिल्हा अध्यक्ष अरविंद ‍गजभिये यांच्या यांच्या नेतृत्वात संपर्क अभियान राबवणार आहेत. भाजपच्या जिल्हयात 560 गावांमध्ये संवाद सभा होणार असुन या पंधरवड्यात पत्रके व इतर साहित्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनसंपर्क करणार आहेत.‍ तपशीलवार कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक 6 जुन 2022 -जिल्हा किसान मोर्चा तर्फे 80 गावात किसान संवाद सभांचे. दिनांक 7 जुन 2022 -जिल्हा युवा मोर्चा तर्फे तर्फे 80 गावात युवा संवाद सभांचे. दिनांक 8 जुन 2022 जिल्हा महीला मोर्चा तर्फे 80 गावात महीला सक्षमीकरण संवाद सभांचे. दिनांक 9 जुन 2022 जिल्हा ओबीसी मोर्चा तर्फे 80 गावात ओबीसी जागर सभांचे. दिनांक 10 जुन 2022 जिल्हा अनु.जाती मोर्चा तर्फे 80 गावात गरीब कल्याण संवाद सभांचे. दिनांक 11 जुन 2022 जिल्हा अनु.जमाती मोर्चा तर्फे 80 गावात आदीवासी संवाद सभांचे, व दिनांक 12 जुन 2022 जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे 80 गावात अल्पसंख्यांक संवाद सभांचे असे एकून ५६० सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 जुन 2022 ते 15 जुन सर्व बुथ स्तरावर जन संपर्क अभीयान यात सर्व शक्ती केन्द्र प्रमुख बुथ प्रमुख पुढील 13 ते 15 जुन पत्रक घरोघरी पोहचवतील. बूथ सशक्तिकरण अभियान आगामी लोकसभा-2024 व विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा भाजपाने बूथ सशक्तिकरण अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियाना अंर्तगत जिल्हयात एकुण 33 पदाधीका-यांची लोकसभा टिम प्रत्येक जि.प.क्षेत्रा साठी व न.प. क्षेत्रासाठी 1या नुसार एकुण 80 पदाधीका-यांची विधानसभा टिम तयार केली आहे. या टिम च्या खाली शक्ती केन्द्र प्रमुख व बुथ प्रमुख कार्यरत असतील. यापुर्वीच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे बुथ निहाय विश्लेषण करुन प्रत्येक बुथ ची वर्गवारी A,B,C करण्यात येवुन C वर्गवारी असलेले बुथ वरील टिम मधील पदाधीका-यांना विभागुन दिले जातील. या बुथ वर पक्ष मागे असण्याची कारणे शोधुन त्यानुसार मतदान वाढीसाठी चे उपाय करणे अपेक्षीत आहे. उदा.विवीध योजनांचे लाभार्थी यादी तयार करुन त्यांचेशी संवाद साधणे.संघटनात्मक रचना उभी करणे.पक्षीय कार्यक्रम राबवणे, व पक्षाचा जनाधार वाठविणे यावर भर देणार आहे. हे अभियान यशस्वी करण्याकरीता जिल्ह्याचा कोअर ग्रुप, जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व आघाड्यांची टिम, सर्व मंडळाची टिम पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे आज पत्रकार परिषदेत ला भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, प्रदेश सदस्य डॉ राजीव पोतदार, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भाजप नेते रमेश मानकर,जिल्हा महामंत्री अजय बोढारे , आनंदराव ठवरे, विशाल भोसले, संध्याताई गोतमारे, अंबादास उके, आदर्श पटले, कपिल आदमने प्रामुख्याने उपस्थित होते.(दि.03/06/2022)