नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

हिंगणा तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे - रमेशचंद्र बंग ,माजी मंत्री.

हिंगणा तालुका सद्या कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण भेटत आहेत. तर योग्य उपचाराअभावी अनेकांचा मृत्यु होत आहे. हिंगणा तालुक्यातील कोविड 19 रुग्णांकरिता येथील कोविड सेंटरवर रुग्णखाटा, जीवनरक्षक प्रणाली, तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची तोडकी व्यवस्था असल्याने रुग्णांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

हिंगणा तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे - ( रमेशचंद्र बंग,माजी मंत्री. )हिंगणा तालुका सद्या कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण भेटत आहेत. तर योग्य उपचाराअभावी अनेकांचा मृत्यु होत आहे. हिंगणा तालुक्यातील कोविड 19 रुग्णांकरिता येथील कोविड सेंटरवर रुग्णखाटा, जीवनरक्षक प्रणाली, तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची तोडकी व्यवस्था असल्याने रुग्णांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हिंगणा तालुक्यावर जिल्हाआपत्ती निवारण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यातील नीलडोह, डिगडोह,वानाडोंगरी,रायपूर, टाकळघाट आदी मोठ्या दाट वस्तीच्या लोकवसाहती असून याठिकाणी दिवसागणिक कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत आहे. तालुक्यातील शहरी भागा बरोबरच कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला असल्याने ग्रामीण भागातील लोक भयभीत झालेले तेव्हा प्रशासनाने हिंगणा तालुक्यात विशेष लक्ष देऊन ठोस उपायोजना कराव्या जेणे करून तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार थांबविल्या जाईल. असे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रमेशचंद्र बंग म्हणाले. तसेच पुढे बोलताना बंग म्हणाले की ग्रामीण भागात प्रशासनाद्वारे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी व शासनाचे नियम याबाबत अभिज्ञता दिसून येत आहे त्यामुळे तालुकास्तरावरून ग्रामीण भागातील खेड्या पाड्यातील लोकवस्त्यांमध्ये कोरोना जनजागृती करणे गरजेचे आहे.