नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंगणा येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन,

घोषणाबाजी करून सदर अग्निपथ योजना केंद्र सरकारने बंद करावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार निलेश कदम यांना दिले यावेळी काँग्रेसचे नेते व माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर, जि.प सदस्य संजय जगताप, जि.प सदस्या कुंदा राऊत,माजी जि.प.सदस्य मारोती हजारे,

केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंगण्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन, ही योजना बंद करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन. नागपूर हिंगणा दिनांक 27जुन :- केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शविण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तहसिल कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजता हे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सदर योजना केंद्र सरकारने बंद करावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार निलेश कदम यांना काँग्रेसचे नेते व माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर,जि प सदस्य संजय जगताप, जि प सदस्या कुंदा राऊत,माजी जि. प.सदस्य मारोती हजारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद उमरेडकर,वानाडोंगरी शहराध्यक्ष नितेश भारती,विलास काचोरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. केंद्रसरकारने अग्नीपथ योजना जाहीर केली .त्या योजनेमुळे देशात अग्नीविर तयार करण्याचे धोरण राबविले जात आहे.या अग्नीपथ योजनामुळे देशात फक्त ४ वर्ष रोजगार देवून बेरोजगाराची फसवणूक होणार आहे. या अग्नीविरांना चार वर्ष शासकीय सेवा देवून २५ टक्के अग्नीविरांना नियमित सेवेत समाविष्ट करणार असाल, तर ७५ टक्के अग्नीविराचे भवितव्य अंधारात जाणार आहे. या ७५ टक्के अग्नीविरांना नंतर रोजगार मिळनार नसल्याने अग्नीपथ योजना रद्द करुण सरकारी रोजगार उपलब्ध करण्याचे दृष्टीने केंद्रसरकारने धोरण जाहीर करावे, अग्नीपथ योजनेत २५ टक्के अग्नीवीरांना रोजगार उपलब्ध होईल यात सुद्धा शंका निर्माण होत आहे. करिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेतील अग्नीविरांना समर्थन देऊन भा.ज.पा. च्या केंद्रसरकारने जाहीर केलेली अग्नीपथ योजना त्वरीत रद्द करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या धरणे आंदोलना महिला आघाडी अध्यक्ष शालिनी मनवर, नीलिमा नागदेवें, रागिणी रोडे,सुरेंद्र सिंह,माजी सरपंच नवसु गवते,ग्रा प सदस्य सलाम शेख,देवचंद काळे,गजानन लारोकर, सुधीर मस्के,दीनानाथ कांबळे, सुदर्शन वाघमारे,अनिल सेन,केशवराव पांडे,नरेंद्र गुजरकर,संजय लोखंडे,रोशन येळणे,ऋषभ दाभेकर,सत्येंद्र सिंह, विकास धोटे,केशव आष्टणकर,रोशन गुरनुले, वसंत ठाकरे, नरेंद्र जयस्वाल, अरविंद वाळके,भीमराव भलावी, रामू करडे, संभाजी पवार, प्रमोद धोटे, मंगेश मोहर्ले, संतोष काचोरे,दुर्गाप्रसाद चित्रीव, संदीप नेहारे ,जगदीश मडावी आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.(दि.27/जुन 2022)