नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नंदनवन येथे जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये यज्ञ प्रवेश कार्यक्रम संपन्न

जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल ही फक्त शाळा नसून संस्कार केंद्र आहे. हे या कार्यक्रमातून दिसून आले. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा

नागपूर दिनांक 1 जुलै रोजी:- श्री शास्त्री शिक्षण संस्था द्वारा संचालित जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल, नंदनवन येथे सकाळी ८.०० वाजता. प्रवेश, कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूल ही फक्त शाळा नसून संस्कार केंद्र आहे. हे या कार्यक्रमातून दिसून आले. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. यज्ञपूजा करुन विद्यार्थ्यांनी वाईट विचारांची आहूती दिली. व उत्कृष्ट विद्यार्थी होवू अशी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विंकीजी रुघवानी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप मोटवानी, डॉ.राकेश किपलानी, सौ.अनुपमा क्रिपलानी, शास्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक मानकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय रक्षिये यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सौ. पुष्करणी रक्षिये यांनी केले. या कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ.दिलीपजी सेनाड, सदस्या सौ.प्रगती मानकर, संचालिका सौ.अंकिता मानकर वैद्य, लेट एम.एल.मानकर गुरुकूल इंग्लिश स्कुलच्या संचालिका सौ.अपेक्षा मानकर-गोतमारे, प्राचार्य अमोल भोंगाडे, जवाहर गुरुकूल विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव मेटांगे, जवाहर गुरुकूल उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय निंबाळकर, जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्या सौ.कांचन तिवारी, सर्व पालकवृंद, सहकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(दि.01/07/2022)