नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

सावनेर–कळमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही – आमदार डॉ .आशिषराव देशमुख

सावनेर–कळमेश्वर तालुक्यातील सर्व गावांना नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच येणाऱ्या उन्हाळ्यात कोणत्याही गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये

नागपूर- सावनेर दिनांक 5 जानेवारी 2026:- सावनेर–कळमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही – आमदार डॉ. आशिषराव देशमुख* सावनेर-कळमेश्वर तालुका पाणीटंचाई आढावा बैठक जननेता डॉ.आशिषराव देशमूख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सावनेर–कळमेश्वर तालुक्यातील सर्व गावांना नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच येणाऱ्या उन्हाळ्यात कोणत्याही गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिले. दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर तालुक्याची आढावा बैठक सावनेर पंचायत समिती येथे तसेच कळमेश्वर तालुक्याची आढावा बैठक कळमेश्वर पंचायत समिती येथे संपन्न झाली. या बैठकीत सावनेर व कळमेश्वर या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची आवश्यकता आहे, त्या गावांकडून माहिती घेण्यात आली. हंडपंप, विहीर, नळयोजना आदी विविध मागण्यांची सविस्तर नोंद करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सांगितले की, येणाऱ्या उन्हाळ्यात सावनेर–कळमेश्वर तालुक्यातील कोणत्याही गावाला दुष्काळ किंवा पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये. सर्व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच, अधिकारी व संबंधित यंत्रणांनी योग्य व तातडीच्या उपाययोजना कराव्यात. यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, इच्छुक सरपंचांना महाराष्ट्रातील आदर्श गावांचा अभ्यास दौरा घडवून देण्यात येईल. भास्करराव पेरे, पोपटराव पवार यांच्या गावांप्रमाणे सावनेर–कळमेश्वर तालुक्यातही आदर्श गावे निर्माण करून सर्वांगीण विकास साधला जाईल, असेही आमदार डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, अशोक तांदुळकर, तहसीलदार अक्षय पोयाम, गट विकास अधिकारी हिरुडकर, तहसीलदार विकास बिक्कड, चंद्रशेखर लांडे, बाबा बुर्‍हान, प्रमोद पिंपळे, प्रिया मानकर, मीना तायवाडे, स्वप्नील चौधरी, शैलेंद्र अस्वले, संदीप उपाध्ये, दिलीप धोटे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमोद पिंपळे, प्रिया मानकर, मीना तायवाडे, स्वप्नील चौधरी, शैलेंद्र अस्वले, संदीप उपाध्ये, दिलीप धोटे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.