नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

AVI फाउंडेशनतर्फे वैद्यकीय शिबिर यशस्वी

AVI फाउंडेशनतर्फे पेंच राष्ट्रीय उद्यानातातील वनपरीक्षक, पायी गस्त घालणारे पथक आणि जंगलाच्या काठावर राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी वैद्यकीय शिबिर

AVI फाउंडेशनतर्फे वैद्यकीय शिबिर यशस्वी नागपूर दि.27जुलै :- AVI फाउंडेशनतर्फे पेंच राष्ट्रीय उद्यानातातील वनपरीक्षक, पायी गस्त घालणारे पथक आणि जंगलाच्या काठावर राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.जेरील बानाईत यांच्या मार्गदर्शनात झालेल्या शिबिराला पेंच उद्यानाचे उपक्षेत्र संचालक रजनीश सिंग यांची उपस्थिती होती. डॉ.जेरिल बानाईत, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अविनाश बानाईत, बालरोगतज्ज्ञ डॉ.अमित अग्रवाल, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.ध्रुवज्योती साहा, नेत्रतज्ज्ञ डॉ.स्नेहा अग्रवाल आदींनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी डॉ.मेघना अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.जयश्री बानाईत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.यश बानाईत, पॅथॉलॉजी तंत्रज्ञ अनिमेश गर्ग, Avi फाउंडेशनचे सारंग आखाडे यांची व इतरांचीही उपस्थिती होती. (दि.26 जुलै 2022)