नागपूर : १५ ऑगष्ट:- खादी फॉर नेशन खादी फॉर फॅशनमध्ये प्रचार प्रसार तळागाळापर्यंत.
आजादी का अमृत महोत्सवच्या सुवर्ण मुहूर्तावर नुकत्याच झालेल्या १४ ऑगष्ट रोजी खादी फॉर नेशन खादी फॉर फॅशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयप्रकाश गुप्ता तसेच पियुष वानखेडे रिजनल हेड HCL फाउंडेशन व रोटरी वेस्टचे अध्यक्ष गजानन रानडे आणि VNIT कॉलेजचे डॉ.दिलीप पेशवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खादीचा प्रचार प्रसार तळागाळापर्यंत करणे तसेच या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा हा मुख्य उद्देश होता. या दरम्यान मुलांचा फॅशन शो घेण्यात आला. पहिल्या राउंड मध्ये सर्वसामान्य शाळेचे विद्यार्थी होते. दुसऱ्या राउंड मध्ये मेंटली चॅलेंज मुलं होते. तिसरा राउंड शांतीनगर इसासनी येथील स्लमच्या मुलांचा समावेश होता. शांतीनगर इसासनी येथील महिलांनी तयार केलेले दागिने या मुलांनी घातले होते. कार्यक्रमात मुलांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाखान्याजोगा होता. बक्षीस वितरण डॉ. पेशवे व गजानन रानडे तसेच डॉ. प्रफुल्ल दाढे आणि डॉ.श्वेता देवतळे यांनी केले. संचालन सिंपली सिटीच्या प्रमुख दुर्गेश दीक्षित यांनी केले तर आभार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड डेव्हलपमेंट च्या डॉ.स्वाती पडोळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिणी भालेराव यांनी अथक प्रयत्न घेतले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. (दि.15 ऑगष्ट 2022)