नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

बांबू लागवडीचा पेपर उद्योगाला लाभ होणार - नितीन गडकरी केंद्रीय मंत्री

देशात बांबूचे उत्‍पादन अधिक झाल्‍यास त्‍याचा पेपर व इथॅनाल निर्मितीसाठी तसेच, पर्यावरणालाही लाभ होईल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.

नागपूर, दिनांक 18 सप्टेंबर :- बांबू हे गवत असल्‍याचे मान्‍य करत वन मंत्रालय व केंद्र सरकारने ते तोडण्‍यास परवानगी दिल्‍यामुळे आता पडीत जम‍िनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली जात आहे. देशात बांबूचे उत्‍पादन अधिक झाल्‍यास त्‍याचा पेपर व इथॅनाल निम‍ितीसाठी तसेच, पर्यावरणालाही लाभ होईल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले. पेपर ट्रेडर्स असोसिएशन, नागपूरतर्फे आयोजित तीन दिवसीय 61व्‍या ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद, फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्‍या दुस-या दिवशी रविवारी नितीन गडकरी यांनी परिषदेला उपस्‍थ‍िती लावली. गडकरींच्‍या हस्‍ते स्‍मरणिकेचे प्रकाशन करण्‍यात आले. नितीन गडकरी यांनी वर्ष 2022-23 साठीचे एफपीटीएचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष असीम बोर्डीया यांचे अभिनंदन केले तसेच, देशभरातून आलेल्‍या पदाधिकारी व प्रतिनिधीचे संत्रानगरीत स्‍वागत केले. नितीन गडकरी म्‍हणाले, पेपर ट्रेडर्सच्‍या समस्‍यांची मला जाणीव असून सर्व जण जीएसटीला घेऊन चिंतेत आहे. आज आपला देश पाचव्‍या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थसत्‍ता बनत असला तरी आपल्‍याला मोठ्या प्रमाणात पेपरची आयात करावी लागत आहे. आयटी इंडस्‍ट्रीमुळे पेपरचा वापर कमी होत असताना उद्योगाची अशी स्थिती विचार करण्‍यासारखी आहे. पण येत्‍या काळात पेपर उद्योगाला चांगले दिवस असा विश्‍वासही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाचा पदभार स्‍वीकारल्‍यानंतर असीम बोर्डीया यांनी सर्वांचे आभार मानले व आपले कर्तव्‍य मी अतिशय निष्‍ठेने, विचारपूर्वक, जबाबदारीने व सकारात्‍मकतेने पार पडण्‍याचा प्रयत्‍न करील, असे उद्गार काढले. पेपर हा देशाच्‍या विकासातील महत्‍वाचा भाग असून देशाच्‍या जीडीपीचे आकलन कागदाच्‍या विक्रीवरून केले जाऊ शकते. त्‍यामुळे राष्‍ट्राच्‍या प्रगतीत पेपर उद्योग महत्‍वाची भूम‍िका निभावत आहे, या उद्योगाचा आपण एक भाग असल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. यावेळी प्रवीण दटके यांच्‍यासह पेपर ट्रेडर्स असोसिएशन राष्‍ट्रीय अध्‍यक्ष महेश खंडेलवाल यांच्‍यासह आशिष खंडेलवाल, अध्यक्ष, पीटीए, नागपूर, हर्षित भन्साळी, सचिव, पीटीए, नागपूर; स्वागत समितीचे अध्यक्ष विजय खंडेलवाल, ललित सूद, संदीप अग्रवाल, किशोर कुशलानी यांच्‍यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले.(दि.18सप्टेंबर 2022)