नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मध्यप्रदेश मधील इंदौर येथे 13 वे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर साहित्य संमेलन येत्या 12 नोव्हेंबर रोजी

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व युवागायक स्वराज सरकटे यांचे राष्ट्रभक्ति आणि उपशास्त्रीय गायन आयोजित करण्यात आले

इंदौर दिनांक, 12 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश मधील इंदौर येथे 13 वे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर साहित्य संमेलन येत्या 12 नोव्हेंबर शनिवार रोजी संपन्न होणार आहे. प्रीतमलाल दुवा सभागृह इंदौर येथे आयोजित हे संमेलन सकाळी आठ वाजता उद्घाटनाने सुरुवात होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व युवागायक स्वराज सरकटे यांचे राष्ट्रभक्ति आणि उपशास्त्रीय गायन खास आयोजित करण्यात आलेले आहे. सावरकर प्रेमी मित्र मंडळ, वीर सावरकर स्मारक समिती इंदौर आणि अखिल भारतीय हिंदू महासभा इंदौर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी रामकृष्ण मिशनचे स्वामीनिर्वेकानंद, संमेलनाध्यक्ष अभिनेते योगेश सोमन, तसेच प्रमुख अतिथी शंकर गायकर, स्नेहल पाठक, प्रमोद सरकटे, भाऊ सुरडकर श्रीराम महाशब्दे, वीर सावरकर स्मारक समिती आणि अखिल भारतीय हिंदू महासभा इंदोरचे राष्ट्रीय मंत्री पवनकुमार त्रिपाठी, प्रदेशाध्यक्ष मनीष चव्हाण, जिल्हाध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर, महानगर इंदोर अध्यक्ष योगेश मराठा, आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. देशभक्ती आशय असलेली गाणी, सावरकरांची राष्ट्रभक्ती गाणी स्वरराज च्या वंदे मातरम या कार्यक्रमात सादर होणार आहेत. प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांना इंदौर येथील वाद्यवृंद साथसंगत करणार आहे. प्रीतमलाल दुवा सभागृहात, हा सांस्कृतिक कार्यक्रम खास देशभक्त श्रोत्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधील अनेक सावरकर प्रेमी श्रोते या संमेलनासाठी उपस्थित असणार आहेत.(दि.10 नोव्हेंबर2022)