नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

दवलामेटी अमरावती रोडवर जो जीता वही सिकंदर सायकल स्पर्धेचे आयोजन

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्पोर्टिंग क्लब दवलामेटी आयोजित ७० कि.मी.सायकल रेसिंग प्रतियोगीता - वाडी येथील पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या हस्ते सायकल रेसिंग स्पर्धेला

नागपुर दिनांक.19 फेब्रुवारी 2023:- पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्पोर्टिंग क्लब दवलामेटी आयोजित ७० कि.मी.सायकल रेसिंग प्रतियोगीता - वाडी येथील पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या हस्ते सायकल रेसिंग स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. प्रथम पारितोषिक यवतमाळच्या विवेक पवार यांनी पटकावाला, द्वितीय पारितोषिक रायपूर छत्तीसगडच्या नंदकुमार यांनी पटकावला आणि तृतीय पारितोषिक परभणीच्या रहेमान शेख यांनी पटकावला असुन या स्पर्धेत ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीचे विश्वस्त विलास गजघाटे यांच्याकडून प्रथम बक्षिस इंपोर्टेड सायकल (रोड बाईक) रु. 35,000/- किंमतची व चषक देण्यात आला.द्वितीय पारितोषिक रेसिंग किट 15000/- रु. किमंतीची विनोद गोडबोले यांना पोलिस निरीक्षक वाडी यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय पारितोषिक टायटन कंपनीचे १०,०००/- चे स्मार्ट घड्याळ किमंतीची पवन गुरव, सुधाकर निनावे, तिरुपती घोडे यांनी दिले. या कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डीन राज गजभिये हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आयोजी शरद मेश्राम यांनी केले तर नितीन अडसड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करिता सुरेश ठाकरे, अशोक मंद्रेवार, बापू दहिवले, सौरभ रंगारी, संतोष डोंगरे, सुभान भाई शेख, राजू मांडेकर, भाऊसाहेब वासनिक, रवींद्र कांबळे, कमलेश कोचे, सुभाष गडपाल, समाधान चोरपगार आदी उपस्थित होते. (दि.19/2/2023)