नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

सुरवंदिता प्रस्तुत. नागपुर येथे 11 मार्च रोजी आयोजन

आला आला मोका मिठीचा दे झोका सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम एक नवीन संकल्पनेवर आधारित विख्यात सुरवंदिता संगीतमय स्पेशल..कार्यक्रम शनिवार दिनांक 11 मार्च रोजी, सायंकाळी 5:45 वाजता. सायंटिफिक सभागृह आठ रस्ता चौक,

नागपुर दि,9 मार्च 2923 :- आला आला मोका मिठीचा दे झोका सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम एक नवीन संकल्पनेवर आधारित विख्यात सुरवंदिता संगीतमय स्पेशल दर्जेदार गाणी सादर करतील. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. निशिगंधा वाड यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 11 मार्च रोजी, सायंकाळी 5:45 वाजता. सायंटिफिक सभागृह आठ रस्ता चौक, लक्ष्मी नगर नागपूर येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उमा रघुरामन व हेमंत दारव्हेकर यांच्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध निवेदिता श्वेता शेलगावकर आणि लेखक कवी साहित्यकार विजय जथे करणार असल्याची माहिती दिली. यावेळी गायक कलाकार हेंमत दारव्हेकर, उमा रघुरामन, गोपाल के. अय्यर, आशुतोष चहांदे, के. राम, गीता राजगोपालन, नुपूर जोगळेकर, विजया वाईंदेसकर, वरदा परांजबे आणि कल्पना गणवीर आपली गाणी सादर करतील. अशी माहिती पत्रकांराना यावेळी दिली. कार्यक्रमाचे संगीत परिमल जोशी यांचे राहतील. हा कार्यक्रम संगीतकार प्रेमीसाठी निशुल्क आहे. जास्तीत जास्त संगीतमय श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे पत्रकार परिषदेमध्ये विजय जथे यांनी सांगितले. (दि.9 मार्च 2023)