नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

पोद्दारेश्वर मंदिराच्या शताब्दी शोभायात्रेचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

श्री.पोद्दारेश्वर राम मंदिराच्या आज निघालेल्या श्रीराम जन्मोत्सव शताब्दी शोभायात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.

नागपूर, दि. 30 मार्च 2023:- श्री.पोद्दारेश्वर राम मंदिराच्या आज निघालेल्या श्रीराम जन्मोत्सव शताब्दी शोभायात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. नागपूर शहरातील दोन शोभायात्रांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला. यावेळी रामभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे यांच्यासह पोद्दारेश्वर राम मंदिराचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.शोभायात्रेपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या रथाचे पुजन व महाआरती करण्यात आली. दरवर्षी नागपूर शहराच्या महापौरांच्या हस्ते ही पूजा करण्याची परंपरा आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक असल्यामुळे यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्य सर्व आमदार, माजी आमदार, खासदार ,माजी खासदार , उत्सवातील पदाधिकारी ,उपस्थित गणमान्य मान्यवरांनी रथ ओढून या शोभायात्रेची सुरुवात केली.नागपूरची रामनवमी शोभायात्रा ही संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. वेगवेगेळ्या प्रकारचे रथ, त्यावर देवी देवतांच्या रूपातील बाळगोपाळांची उपस्थिती लक्षवेधी होती. उपराजधानीतील राम जन्मोत्सवाची ही प्राचीन परंपरा असून अवघ्या नागपूर शहरातील नागरिक दर्शनासाठी प्रमुख रस्त्यांवर उत्साहात असतात. रात्री उशिरापर्यंत शहरातील प्रमुख मार्गाने ही शोभायात्रा मार्गक्रमण करते. यावर शहरातील प्रमुख चौकांमध्ये पुष्पवृष्टी केली जाते 1923 पासून श्री. पोद्दारेश्वर राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढली जाते. हे शताब्दी वर्ष होते. कोरोनामुळे गेली तीन वर्ष शोभायात्रा निघाली नव्हती, त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते. रामनगर येथील शोभायात्रेला उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, रामनगर येथील राम मंदिरातून निघालेल्या शोभायात्रेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी त्यांनी मान्यवरांसमवेत राम मंदिरातील पालखी व रामरथाचे पूजन केले. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी रामनगर परिसरातून रामनवमी निमित्त निघालेल्या बाईक रॅलीला झेंडा दाखवला होता. रामनगर येथे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, कोषाध्यक्ष विनोद जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत यंदा 33 चित्ररथ सहभागी झाले होते. यात कुंभकर्ण वध, प्रहार झांकी, श्रीराम धनुष्यधारी, श्री गजानन महाराज, जगदंबा देवी कोराडी या चित्ररथांचा प्रामुख्याने समावेश होता.(दि.30 मार्च 2023)