नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

गायक व संगीतकार श्री कल्याणजी गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा कंठ संगीतरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई येथे गायक व संगीतकार श्री, कल्याणजी गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा कंठ संगीतरत्न पुरस्कार प्रदान- शुभ हस्ते सांस्कृतिक कार्य मंत्री मा श्री सुधीरजी मुनगंटीवार

मुंबई.दिनांक ,10-एप्रील -2023:- रोजी मुंबई येथे गायक व संगीतकार श्री कल्याणजी गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा कंठ संगीतरत्न पुरस्कार प्रदान- शुभ हस्ते सांस्कृतिक कार्य मंत्री मा श्री सुधीर जी मुनगंटीवार साहेब. पं कल्याणजी गायकवाड यांचे मनोगत - हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नसून वारकरी संप्रदायातील संगीत साधना करणार्‍या तमाम संगीत साधकांचा आहे...ही केवळ पांडुरंगाची श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज व माझे प्रथम गुरू ह भ प मच्छींद्र म गोधे वै गुरूवर्य ह भ प जयराम महाराज भोसले.ह भ प गुरूवर्य मारूती बाबा कुर्‍हेकर गुरूवर्य पंडित रघुनाथजी खंडाळकर व गुरूवर्य पंडित अजयजी पोहनकर तसेच महाराष्ट्रातील तमाम संगीत रसिक यांची कृपा आहे. महाराष्ट्र शासनाने हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले त्या बद्दल सांस्कृतिककार्य मंत्री मा श्री सुधीर जी मुनगंटीवार साहेब सांस्कृतिक संचालनालय मंत्रालय मुंबई संचालक मा. श्री बिभीषणजी चौरे साहेब व पुरस्कार निवड समिती या सर्वांचे मनापासून आभारअनेक अनेक धन्यवाद..(दि.10 एप्रील 2023)