नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मध्य भारतातीलआंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र व्हावे - प्रो. हरेराम त्रिपाठी

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा, स्थापना दिन समारोह, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या स्थापना दिन समारोह

रामटेक दिनांक 18 सप्टेंबर 2023 :- कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मध्य भारतातीलआंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र व्हावे - प्रो. हरेराम त्रिपाठी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा, स्थापना दिन समारोह, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या स्थापना दिन समारोह आज सोमवार, दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता रामटेक येथे संपन्न झाला. विश्वविद्यालयाच्या स्थापनेला 26 वर्षे पूर्ण होवून 27 व्या वर्षात, विश्वविद्यालयाने पदार्पण केले आहे. रजतमहोत्सवी स्थापना दिनाला प्रमुख अतिथी या नात्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू मा. डाॅ. पंकज चांदे उपस्थित होते तर विशिष्ट अतिथी या नात्याने प्रो. शीतलाप्रसाद शुक्ला, अधिष्ठाता, साहित्य व संस्कृती संकाय, श्रीलालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी भूषविले. प्रो. मधुसूदन पेन्ना, अधिष्ठाता, भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकाय, कुलसचिव डाॅ. रामचंद्र जोशी यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमापूर्वी भारतीय ध्वज आणि विश्वविद्यालयीन ध्वज फडकवण्यात आला. यानंतर मुख्य कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती स्तवन आणि विश्वविद्यालयीन गीताने झाला.संस्कृत भाषा आणि साहित्य संकायाच्या अधिष्ठाता प्रो. कविता होले यांनी विश्वविद्यालयाच्या 26 वर्षांच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला,विशेष अतिथी प्रो. शीतलाप्रसाद शुक्ला यांनी, विश्वविद्यालयाच्या स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मा. कुलगुरू प्रो. त्रिपाठी यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वाखाली कालिदास संस्कृत विश्वविद्यालय विश्वपटलावर आपले विशेष स्थान निर्माण करेल. हे विश्वविद्यालय केंद्रीय विश्वविद्यालय व्हावे या शुभेच्छाही त्यांनी याप्रसंगी दिल्या. प्रो. मधुसूदन पेन्ना संपादित भारतीय दर्शन ग्रंथाचे प्रकाशन , विश्वविद्यालयाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून प्रो. मधुसूदन पेन्ना संपादित भारतीय दर्शन या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आस्तिक व नास्तिक दर्शनांचा परिचय या पुस्तकात देण्यात आला आहे. संस्कृत विश्वविद्यालयातर्फे भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित ग्रंथप्रकाशनयोजने अंतर्गत प्रस्तुत ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्य अतिथी संस्थापक कुलगुरू डाॅ. पंकज चांदे यांनी विश्वविद्यालयाने आता आंतरराष्ट्रीय विद्याथ्र्यांना लाभान्वित आणि आकर्षित करतील असे संस्कृतचे विविध अभ्यासक्रम तयार केले पाहिजे तसेच ते अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकविणारे शिक्षक नियुक्त केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय विद्याथ्र्यांना आकर्षित करणे हे गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापनकौशल्य असलेले उत्तम शिक्षक यावरच अवलंबून आहे. यासाठी विश्वविद्यालयाने अग्रक्रमाने प्रयत्न करावे. विश्वविद्यालयाला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाल्यास त्याचा अनेक प्रकारे विश्वविद्यालयाला फायदा होईल. प्रो. मधुसूदन पेन्ना यांनी विश्वविद्यालयात पूर्व कुलगुरूंनी दिलेल्या योगदानावर आणि प्रगतीच्या टप्प्यांवर भाष्य केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी पंचवर्षीय आराखडयातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. वारंगा येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसर विकसित करून मध्यभारतात देश-विदेशातील विद्यार्थ्यांकरिता आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यास आपला अग्रक्रम असल्याचे स्पष्ट केले. हा परिसर लवकरात लवकर विकसित करून तेथे शैक्षणिक कार्य सुरू करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग केंद्र विकसित करण्याची योजना
आंतरराष्ट्रीय योग केंद्र विकसित करण्याची योजना तयार केली जात आहे. तसेच शासनाकडून मान्य उपकेंद्रांपैकी परभणी उपकेंद्राच्या उभारणीकडे लक्ष दिले जाईल. विश्वविद्यालयाचा विकास होण्यासाठी लोकांचा पाठिंबा आणि अर्थबल या दोन्हींची गरज असते. लोकांचा पाठिंबा तर आहेच परंतु शासनाने अर्थबल वेळेत दिल्यास विकासकामाची गती अवरुद्ध होणार नाही. संस्कृतचा प्रचार-प्रसार आणि विश्वविद्यालयाचा विस्तार या दोन्ही आघाडयांवर विश्वविद्यालय निरंतर कार्य करीत आहे. याशिवाय भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित विविध अभ्यासक्रमांची रचना आणि त्याचे विविध विद्यापीठातील परिचालन यावर विशेष कार्य सध्या विश्वविद्यालय करीत आहे. छात्रा, कर्मयोगी आणि प्राध्यापक सन्मान सोहळा - विश्वविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रथम येणा-या विद्याथ्र्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील. तसेच उत्तम कामगिरी करणा-या प्राध्यापक व कर्मयोगी प्राध्यापक यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन डाॅ. सुमित कठाळे, सहायक कुलसचिव, मुक्त व दूरस्थ केंद्र यांनी केले तर आभार डाॅ. रोशन अलोणे , उपकुलसचिव, आस्थापना विभाग यांनी मानले . प्रा. रेणुश्री बनसोड यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.(दि.18/9/2023)