नागपूर दि.10 ऑक्टोंबर 2023 : - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी सव्वादोनच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगानातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. तेलंगाना राज्यातील आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत. सभेनंतर ते हैदराबाद येथे जाणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज
त्यांचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार मोहन मते,नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त विजय सागर यांनी स्वागत केले