नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना राञी ऐवजी दिवसा विजपुरवठा करण्रायात यावाअसे मागणीचे निवेदन देतांना - तालुकाध्यक्ष डाॅ.राहुल दाभाडे, वंचित बहुजन आघाडी युवा तालुकाध्यक्ष सह अदी कार्यकर्ते

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी देणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे, शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना राञी ऐवजी दिवसा विजपुरवठा करावा

मेहकर ,दिनांक, 20 डिसेंबर 2023 :- शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना राञी ऐवजी दिवसा विजपुरवठा करा-तालुकाध्यक्ष डाॅ.राहुल दाभाडे, वंचित बहुजन युवा आघाडीचा आंदोलनाचा ईशारा मेहकर- सध्या रब्बी हंगाम सुरु असुन यंदा राज्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची रब्बी पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.शेतकरी आता गहू,हरभरा सह भाजीपाला पिकांना पाणी देत आहेत. मात्र त्याच वेळेस राज्य महावितरण कंपनीच्या माध्यमातुन रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या रात्रीच्या वेळी थंडीत मोठी वाढ झाली आहे.त्यातच बिबटे ,रानडुकरे,रोही या रानटी प्राण्यांचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी देणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी पीक जगवण्यासाठी एकत्र येत सामूहिक काम करत आहेत. दरम्यान, रात्री वीज रोहित्राचा फ्यूज गेला किंवा किरकोळ बिघाड आला तर तो व्यवस्थित करण्यासाठी कर्मचारी रात्रीला उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावी लागत आहे. हे काम नाही जमले तर  त्या दिवशी पिकांना पाणी देणं मुकलेच म्हणून समजा अशी स्थिती आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शेतीसाठी कृषी पंपासाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा,सुधारित वेळापञकाची माहिती शेतकर्‍यांना सुचित करण्यात यावी. शेतकरीहिताच्या या मागणीची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी मेहकर तालुका कमिटीच्या वतीने आक्रमक स्वरुपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा तालुकाध्यक्ष डाॅ.राहुल दाभाडे यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव वानखेडे, ता.उपाध्यक्ष दिपक पाडमुख,ता.उपाध्यक्ष प्रदिप सरदार,ता.सचिव सिद्धार्थ अवसरमोल, एड.एस.टी.कटारे कायदेशीर सल्लागार, ता.प्रसिद्धिप्रमुख राहुल पाडमुख,शुद्धोधन सदार ता.संघटक,शालीकराम अंभोरे ज्येष्ठ नेते,अनिल देबाजे ता.उपाध्यक्ष,प्रभाकर ईंगळे ता.सचिव,ता.सचिव श्रिराम हुले,शेख मुनाफ,जमिर भाई,जितेंद्र दाभाडे ता.सचिव,विशाल आराख ता.सचिव,प्रविण अंभोरे ता.संघटक,समाधान भवाळ ता.संघटक,सम्यकचे अविनाश गवई,रोहित झरे,मनोज अंभोरे,शाखा प्रमुख वैभव चव्हाण,शाखा प्रमुख महेंद्र सदार,किशोर अवसरमोल,नवनित सुरडकर,निलेश वानखेडे,अशोक भुजंग यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भर रब्बी हंगामात काढण्यासाठी शेतकरीवर्ग मेहनत घेताना दिसत आहेत मात्र त्याच वेळेस राज्य महावितरण कंपनीने आपल्या लीला दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दिवसा कायमच वीज गायब असते तर रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास महावितरण कंपनीने प्रारंभ केला आहे.सध्या रात्रीच्या वेळी थंडीत मोठी वाढ झाली आहे.त्यातच बिबटे, रानडुकरे या रानटी प्राण्यांचा संचार वाढल्याने
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी भरण्यास जाणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे.या बाबत महावितरण कंपनीस कल्पना देऊनही शेतकऱ्यांचा कैवार कोणीही घेताना दिसत नाही हि दुर्भाग्याची गोष्ट असून महावितरण कंपनीने दिवसा वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा विजवितरण कंपनीच्या कार्यालयात आक्रमक आंदोलन उभारण्यात येईल अशी आक्रमक भूमिका  तालुकाध्यक्ष डाॅ.राहुल दाभाडे यांनी घेतली आहे.*