नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

भक्तांनी दक्षता घ्यावी - आपलीही फसवणूक होऊ नये - दुसऱ्यांनाही सावध करा.

श्री गजानन महाराज भक्तांची ऑनलाइन खोली बुकिंग करताना समाजकंटकांकडून खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून होणारी फसवणूक एक काळजीचा विषय - भक्तांनी दक्षता घ्यावी.

दि.31मार्च 2025 :- श्री गजानन महाराज भक्तांची ऑनलाइन खोली बुकिंग करताना समाजकंटकांकडून खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून होणारी फसवणूक एक काळजीचा विषय - भक्तांनी दक्षता घ्यावी. शेगांवला काही महत्वाच्या ठीकाणी एक सूचना देण्यात आली आहे.ती अशी.. नम्र निवेदन.. www.gajananmaharaj.org हेच असून अन्य कोणतेही संकेतस्थळ नाही. श्री संस्थांनच्या शेगांव सह सर्व शाखांमध्ये श्री दर्शन व रूम बुकिंग संबंधी कोणतेही ऑनलाइन बुकिंग करण्यात येत नाही. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 988175 8762 / 952965 8074 यावर संपर्क साधता येईल. मात्र असे असले तरी बरेच भक्त याविषयी अनभिज्ञ आहेत. शिवाय नवनवीन भक्तांना हे माहीत असणं संभवत नाही. याचा गैरफायदा समाजकंटक घेतात. असे आढळून आले पुण्याहून निरंजन वेलणकर यांना त्र्यंबक येथे गजानन महाराज दर्शनाला जाण्याचे मनात आले. त्यांनी ऑनलाईन खोली बुक करण्याचा विचार केला. त्यांना गजानन महाराज संस्थान त्र्यंबक अशी फसवी वेबसाईट आढळली. त्यांनी पाच हजार रुपये भरलेत आणि पुढे त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. दुसरं उदाहरण... ओंकारेश्वरला गजानन महाराज दर्शनासाठी जाण्याचं ब्रह्मपुरी येथील गोपाळ भट्टड यांनी निश्चित केलं. त्यांना महाराज संस्थान ओंकारेश्वर अशी वेबसाईट आढळली. तीन हजार एकशे पन्नास रुपये भरलेत आणि लक्षात आलं की आपण फसलो. मात्र त्यांनी लगेच बँकेला सूचित करून पेमेंट रोखलं. शेगांव संस्थान त्यांच्या तर्फे काळजी घेत आहेच. मात्र हे सर्व इतकं व्यापक होत आहे की एक खोटी वेबसाईट बंद झाली की नामसादृश्य ठेवून दुसरी उभी होत आहे. गजानन महाराज उपासना केंद्राच्या माध्यमातून अनेक भक्तांशी संबंध येत असल्याने लोक कानावर घालतात आणि जाणवतं असामाजिक तत्वांना प्रतिबंध घालायला हवा. म्हणून जनजागृतीसाठी हा लेखन प्रपंच - कृपया गजानन महाराज भक्तांनी या संदर्भात सावध राहून दोन गोष्टी मनात नीट लक्षात घ्याव्यात. व इतरांनाही सावध करावे - 1)www.gajananmaharaj.org हेच शेगांव संस्थानचं एक अधिकृत संकेतस्थळ आहे 2) गजानन महाराज संस्थान शेगांवच्या कुठल्याही शाखेत ऑनलाइन रूम बुकिंग होत नाही. स्वतः सावध व्हा इतरांनाही सावध करा. भाविकांनी कृपया लक्षात घ्यावे. जयंत वेलणकर नागपूर- 94221-08069
2) गजानन महाराज संस्थान शेगांवच्या कुठल्याही शाखेत ऑनलाइन रूम बुकिंग होत नाही. स्वतः सावध व्हा इतरांनाही सावध करा. भाविकांनी कृपया लक्षात घ्यावे. जयंत वेलणकर नागपूर- 94221-08069