नागपूर,दि.9 एप्रिल 2025 :- नागपूर येथील मुळ निवासी मात्र आता मुंबई येथे स्थायीक झालेली सुप्रसिध्द लेखिका कवयत्री नेहा गोडघाटे यांचे नवीन कविता आणि गझल संग्रह कारवान - ए - इश्क चे प्रकाशन १३ एप्रिल रोजी, डॉ. सागर खादीवाला, प्रा. जावेद पाशा, लोकनाथ यशवंत यांच्या शुभहस्ते अर्पण सभागृह हिंदी मोर भवन सिताबर्डी नागपूर येथे सायंकाळी ५.३० वाजता. होणार आहे.
यापूर्वी नेहा गोडघाटे यांचे परवाज हा काव्य संग्रह प्रसिध्द सिने गितकार जावेद अख्तर यांचे हस्ते मुंबई येथे प्रकाशित करण्यात आलेले होते. नेहा गोडघाटे ही शासकीय तंत्र शिक्षण शाळा नागपूर येथे नवव्या वर्गात शिकत असताना त्यांचा पहिला मराठी काव्यसंग्रह इंडिया इज माय कंट्री हे डॉ. यशवंत मनोहर यांचे हस्ते प्रकाशित झाले असून बाबुराव बागुल यांची प्रस्तावना त्यात आहे.
आता प्रकाशित होत असलेले कारवान-ए-इश्क हा त्यांचा तीसरा काव्य संग्रह आहे. यात काव्यात्मक रूपाने मानवीय संवेदना सामाजिक वास्तव महिलांचे वास्तव आणि भारतीय म्हणून संवेदना व्यक्त झालेल्या आहेत. या काव्य संग्रहाला मुबई येथील प्रसिध्द संस्था स्टोरी मिरर यांनी प्रकाशित केलेले आहे. या कार्यक्रमाचे संचालन प्रसिध्द कवी संजय गोडघाटे करणार असून आयोजन छवी
पब्लिकेशन, भारतीय मुस्लिम परिषद आणि फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांनी केलेले आहे. आयोजक संजय गोडघाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.