नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

कु. नावण्या सव्वालाखे हिने 14 वर्षे वयोगटात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले

राष्ट्रीय शालांत बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन,कु. नावण्या सव्वालाखे हिने 14 वर्षे वयोगटात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले

नागपूर दि,28 जुलै 2025 :- ५४ व्या, पि.एम.श्री.केंद्रीय विद्यालय संघटन भारत सरकार कडून राष्ट्रीय शालांत बॉक्सींग चैम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन झासी. (उत्तर प्रदेश) येथे दि.२२ जुलै ते २७ जुलै २०२५ हया दरम्यान आयोजित केलेल्या चैम्पियनशिप मध्ये पि.एम.श्री.केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर अंबाझरी नागपूर मधील विद्यार्थी कु. नावण्या एम.सव्वालाखे हिने १४ वर्ष वयोगटात राष्ट्रीय स्थरावर सुवर्ण पदक संपादन केला. मिळालेल्या यशा मध्ये पि.एम.श्री. केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर शाळेचे मुख्य प्राचार्य तथा शिक्षकगण व नागपूर मानकापुर क्लब चे मुख्य प्रशिक्षक गणेश पुरोहित तथा सह, प्रशिक्षक मिश्रा सर हयांच्या नेतृत्वात हिने यश संपादन केले. आयोजित स्पर्धेत नावण्या सव्वालाखे पि.एम.श्री. केंद्रीय विद्यालय संघटन भारत सरकार यांचा कडुन मुंबई डिव्हीजन कडुन सहभाग घेतला होता. स्पर्धत देशातील ०७ डिव्हीजन मधील ऐकुण ३०४ विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. त्यात सुवर्ण पदकात यश प्राप्त केल्याचे कौतुकास्पद आहे. यापुर्वी एप्रिल २०२५ मध्ये केंद्रीय विद्यालय संघटन राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले होते. हयावरुन तिची निवड राष्ट्रीय शालांत बॉक्सींग चैम्पियनशिप मध्ये झाली होती.
प्राप्त केल्याचे कौतुकास्पद आहे. यापुर्वी एप्रिल २०२५ मध्ये केंद्रीय विद्यालय संघटन राज्य स्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले होते. हयावरुन तिची निवड राष्ट्रीय शालांत बॉक्सींग चैम्पियनशिप मध्ये झाली होती.