नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुषाच्या शुभेच्छा !

सैनिक संघटनाच्या संकल्पनेतुन इंडियन आर्मी कारगील पोस्ट (लद्दाख)भारतीय बॉर्डरवरील सैनिकासाठी नागपूरकरांच्या वतीने नागपूर महाराजा ट्रस्टचे राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या

नागपूर दिनांक.6 ऑगष्ट 2025 :- नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुषाच्या शुभेच्छा ! मागील १९ वर्षापासून नागपूरकरांनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी स्वतः राख्या बनवून सैनिकांना पाठवून दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकराचे संयोजक डॉ. निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपूरातील सामाजिक, आध्यात्मीक, महाविद्यालयीन, सांस्कृतीक क्रिडा व सैनिक संघटनाच्या संकल्पनेतुन इंडियन आर्मी, कारगील पोस्ट (लद्दाख) भारतीय बॉर्डरवरील सैनिकासाठी नागपूरकरांच्या वतीने नागपूर महाराजा ट्रस्टचे राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या प्रमुख हस्ते श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वरजी रक्षक, प्राचार्य विक्रांत चिलाटे, मिसेस युनिवर्स प्रविणा दाढे विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या माध्यमातुन बॉर्डरवर राख्या पाठविण्यात आल्या. देशाच्या सिमेवर २४ तास पहारा देऊन देशातील सर्व नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवून त्यांचा कार्याला सलाम करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नागपूरकरातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून या वर्षीही या अभियानांतर्गत सैनिकासाठी राखी पाठवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. निखिल भुते, तायवाडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, श्रीगुरुदेव युवामंचाचे ज्ञानेश्वर रक्षक, मिसेस युनिवर्स प्रविणा दाढे, प्रा. कमलेश माचेवार, प्रा. अभिजीत दरवाजे, सामाजिक कार्यकर्ते राहुल गुप्ता, प्रा. पंकज बांते, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहुन कार्यक्राला संबोधित केले. यावेळी नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना नागपूरकरां च्यावतीने मिसेस युनिवर्स प्रविणा दाढे, मोनाली कोहले, रिदा शेख, अंजली भांडेकर, खुशी यादव यांनी राखी बांधून दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निखिल भुते, प्रास्ताविक प्रा. विक्रांत चिलाटे, आभार प्रदर्शन कमलेश माचेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तायवाडे फार्मसी कॉलेजचे रिदा शेख, सुहानी राऊत, खुशी यादव, मोहिनी त्रिवेदी, वैशाली भुरे, नेहा तिजारे, मुनाली कोहरे, मिथाली धांगे, अंजली भांडेकर, मैथाली लाबडे, आदित्य
देशमुख, हर्ष मडवकर, सचिन रविदास, मिलिंद अंगदकर, सुमेध पाटील, अर्णव बनसोड, जीवन जावाले हुजेब खान, निहार कवरे व इतर पदाधिकारी, विद्यार्थी आणि विविध सामजिक कार्यकर्त्यानी रात्र दिवस अथक परिश्रम केले. तायवाडे इन्टीट्युट ऑफ डिप्लोमा आणि तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी चे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.