नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

बबनराव घोलप यांची सामाजिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा फलदायी!

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथे निवासस्थानी भेट घेतली!...

नागपूर दि.13 ऑगष्ट 2025 :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथे निवासस्थानी भेट घेतली. सोबत आरसीएम नागपूर अध्यक्ष अनील काटोले, लीलाधर कानोडे, ज्ञानेश्वर काकडे, रुपेंद्र बसेशंकर, महादेव बिंजाडे, प्रभाकर राजूरकर यांनी चर्चा केली. याप्रसंगी चर्चेत संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे मुद्दे मांडले. महामंडळाच्या जाचक अटींची पुर्तता केल्यावर अनेकांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यानंतर शेकडो चर्मकार बांधवांनी लाभार्थी हिस्सा भरला. अनेकांच्या सातबारा वर कर्ज बोजा चढवला. परंतु महामंडळ कर्ज देईना. महामंडळाच्या कार्यालयाच्या चकरा मारुन थकले परंतु निधी नाही हे एकच कारण सांगितले जाते. तरी महामंडळास त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा आणि थकीत कर्ज माफ करावे. अशी आग्रहाची मागणी बबनराव घोलप यांनी केली. याशिवाय संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी शंभर एकर जमीन व निधी त्वरित देण्यात यावा. संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. ॲट्रॉसिटी ॲक्ट ची काटेकोरपणे अंमलबजावणी करून फास्टट्रॅक कोर्टात केसेस चालविण्यात याव्यात. अर्थसंकल्पातील मागासवर्गीय समाजासाठी 18 टक्के राखीव निधी कमी करू नये किंवा इतरत्र वळवू नये. परदेशी शिष्यवृत्ती यांची संख्या व रक्कम वाढवून देऊन त्वरित मंजूर करण्यात यावी. बार्टीच्या धर्तीवर संत रविदास कौशल्य विकास विभाग सुरू करून स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात यावे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे. चर्मकार समाज आयोग सुरू करून त्यावर अध्यक्ष नेमण्यात यावा. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी. मुंबईसह राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावे. राज्यातील गटई कामगारांना गटई स्टाॅलचे त्वरित वाटप करावे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संत रविदास भवनासाठी जागा उपलब्ध करून भवन बांधून देण्यात यावे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ चर्मकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक विकासासाठी गेल्या 28 वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे, तरी या महासंघाला मुंबई येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. संत रोहिदास पुरस्कार प्राप्तकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारा प्रमाणे सर्व सवलती देण्यात याव्यात. गावातील ढोरफोडीच्या जागा समाजभावनासाठी समाजाच्या ताब्यात देण्यात याव्यात. इत्यादी 32 मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्या योग्य असल्याने आदेश काढण्याचे मान्य केले आहे. तसेच श्री संत रविदास छात्रालय परिसरातील अतिक्रमणे काढण्या बाबतचे निवेदन दिले असता, त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. असे राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा नागपूरच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.
असल्याने आदेश काढण्याचे मान्य केले आहे. तसेच श्री संत रविदास छात्रालय परिसरातील अतिक्रमणे काढण्या बाबतचे निवेदन दिले असता, त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. असे राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा नागपूरच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.