नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

स्वातंत्र्यदिनी पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहसोहळा

स्वातंत्र्यदिनी पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहसोहळा पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव पत्रकार व पाल्यांचा सन्मान ...

नागपूरःदिनांक 15 ऑगष्ट 2025:- स्वातंत्र्यदिनी नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लब येथे पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहसोहळा आयोजित करण्यात आला. सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपतीपदक विजेते जॉईंट कमिश्नर ऑफ पोलिस नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या असिस्टंट कमिश्नर सुकेशिनी तेलगोटे विशेषत्वाने उपस्थित होत्या. सोहळ्याच्या प्रारंभी नागपुरातील पुरस्कारप्राप्त पत्रकारांना गौरवान्वित करण्यात आले. यात हुमेरा मरियम (हितवाद), सतीश राऊत (हितवाद), डॉ. योगेश पांडे (लोकमत), योगेंद्र तिवारी (इंडिया टीव्ही), राखी चव्हाण (लोकसत्ता) नरेश शेळके (सकाळ) सुरेश उर्फ छोटू वैतागे (दै. भास्कर), राम भाकरे (लोकसत्ता) श्रीमंत माने (लोकमत), विवेक देशपांडे (इंडियन एक्सप्रेस), रामू भगत (टाईम्स ऑफ इंडिया), ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांचा समावेश होता. पुरस्कारविजेत्यांना जॉईंट कमिश्नर ऑफ पोलिस नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात पत्रकारांच्या ज्या पाल्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत साठ टक्क्यांच्या वर गुण मिळविले आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात कस्तुरी राम भाकरे, तनुषा परितोष प्रामाणिक, तन्मयी बिपेंद्र सिंग, देवांग बिपेन्द्र सिंग, आदिती आनंद शर्मा, देवांग राजेश रामपूरकर, अमोघ हेमंत सालोडकर, गार्गी सुनिल सोनी, रौनक आकाश दुपारे, रिहान दुपारे यांचा समावेश आहे. सत्कार सोहळ्यानंतर राजेश समर्थ व त्यांच्या वाद्यवृंदाने देशभक्तीपर गीतांसह अन्य श्रवणीय गीते सादर केली. गायिका स्वस्तिका ठाकूर यांनीही समधुर गीतांनी श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन नरेश डोंगरे यांनी केले.
याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, पत्रकारसंघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, शिरीष बोरकर व अन्य ज्येष्ठ पत्रकार विशेषत्वाने उपस्थित होते.