नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

विदर्भाची सृष्टी विजय बाहेकर लवकरच झळकणार मोठ्या परड्यावर

दंतवैद्यक क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेली सृष्टी विजय बाहेकर लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार !

नागपूर/ गोंदिया :- २५ सप्टेंबर – दंतवैद्यक क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेली सृष्टी विजय बाहेकर लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. गोंदियात जन्मलेली व वाढलेली सृष्टी आता आपल्या पहिल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहे. छबी हा चित्रपट २६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. अद्वैत मसरकर दिग्दर्शित व जया चेडा निर्मित या चित्रपटात मकरंद देशपांडे, समीर धर्माधिकारी, शुभांगी गोखले, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, राजन भिसे, ध्रुव चेडा, लीना पंडित, अनघा अतुल यांच्यासह सृष्टी महत्त्वाची समांतर प्रमुख भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे संगीत रोहन - रोहन यांनी दिले आहे. सृष्टीने यापूर्वी शिवा, तुमची मुलगी काय करते, जय जय स्वामी समर्थ आणि करण गुन्ह्याला माफी नाही या मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. आता ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सृष्टी म्हणाली माझा पहिला चित्रपट म्हणजे माझ्यासाठी एक मोठं स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. आई - वडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी ही वाटचाल शक्य झाली. छबी नंतर अनेक उत्तम प्रकल्प करण्याची माझी इच्छा आहे. छबी ह्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंती पडलाय छबीची कथा एका तरुण छायाचित्रकाराभोवती फिरते, जो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी कोकण किनाऱ्यावर येतो. निसर्गाच्या सौंदर्यात रममाण होताना त्याला एक रहस्यमय स्त्री भेटते जी फक्त त्याच्या लेन्समध्येच दिसते. मात्र इतरांसाठी त्या छायाचित्रांमध्ये फक्त रिकामे फ्रेम्स असतात. वास्तव आणि मृगजळ यामधली सीमारेषा धूसर होत जाते आणि या प्रवासात अनेक प्रश्न उभे राहतात. दंतवैद्यकातून अभिनयाकडे वळलेल्या सृष्टी बहेकरची ही कहाणी प्रेरणादायी ठरत आहे. गोंदियाची ही कन्या आता मराठी चित्रपटसृष्टीत चमकण्यासाठी सज्ज झाली आहे.
दंतवैद्यकातून अभिनयाकडे वळलेल्या सृष्टी बहेकरची ही कहाणी प्रेरणादायी ठरत आहे. गोंदियाची ही कन्या आता मराठी चित्रपटसृष्टीत चमकण्यासाठी सज्ज झाली आहे.