नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

तिरुपती बालाजी सहकारी पत संस्थेची आमसभा संपन्न

तिरुपती बालाजी सहकारी पत संस्था मर्या.नागपूर यांची आमसभा संपन्न -- खातेधारकांच्या विश्वासावरच पतसंस्थांची प्रगती - अध्यक्ष ललितराव देशमुख!

नागपूर / हिंगणा, दि.२७ सप्टेंबर 2025 :- खातेधारकांचा संस्थेवर विश्वास असेल तरच पतसंस्था प्रगती करु शकतात. तिरुपती बालाजी सहकारी पतसंस्थेला यावर्षी ३३ कोटी ८५ लाख ५४८ हजार ७१ रूपये नफा झाला असून ८२ कोटींच्या वर ठेवी आहेत. संस्थेने ज्येष्ट नागरिकांचा सत्कार केला, तसच माधव नेत्रालयाच्या सहयोगातून डोळ्यांचे शिबिर घेतले. २२ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रदूषणविरहित गावासाठी आसोला येथे २५० वृक्षांचे रोपण करण्यात आल्याचेही याप्रसंगी संस्थेने ज्येष्ट नागरिकांचा सत्कार केला, वार्षिक आमसभा वर्ष-2024 व 2025 :- हिंगणाः तिरुपती बालाजी सहकारी पतसंस्थेच्या सभेत खातेधारकांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष ललितराव देशमुख. तसच माधन नेत्रालयाच्या सहयोगातून डोळ्यांचे शिबिर घेतले. २२ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रदूषणविरहित गावासाठी आसोला येथे २५० वृक्षांचे रोपण करण्यात आल्याचेही अध्यक्ष ललितराव देशमुख यांनी सांगितले. पतसंस्थेची वार्षीक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.26) संस्थेच्या कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ललितराव देशमुख होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष दामोदर सांगोले, सचिव विजय सगणे, रामभाऊ भोंगाडे, साधना येळणे, माजी उपनिबंधक रवींद्र वसू,- व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरराव देशमुख, देशमुख ट्रेडिंगचे भाष्करराव देशमुख,विनायक ईगळे सर यांच्या सह अदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे या वर्षी तेरा हजार सभासद झाले असून याप्रसंगी २०२४ व २०२५ उपविधीला हात वर करुन एकमताने मंजुरी दिली. अहवालवाचन संस्थेच्या कार्यकारी अधिकारी शिला बढे यांनी केले. संचालन कल्पना त्रीभुवनकर यांनी केले. आभार गजानन शिवरकर यांनी मानले.
करुन एकमताने मंजुरी दिली. अहवालवाचन संस्थेच्या कार्यकारी अधिकारी शिला बढे यांनी केले. संचालन कल्पना त्रीभुवनकर यांनी केले. आभार गजानन शिवरकर यांनी मानले.