नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

भारतीय संविधान जनतेच्या जीवनशैलीचा श्‍वास आमदार रोहित पवार

जळगाव ,भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रास्ताविकेतूनच जो विचार दिला आहे, तो अत्यंतिक महत्त्वाचा आहे. संविधान हे जनताभिमुख असून, जनताच सार्वभौम आहे

भारतीय संविधान जनतेच्या जीवनशैलीचा श्‍वास आमदार रोहित पवार ः जळगावात सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे व्याख्यान जळगाव : भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रास्ताविकेतूनच जो विचार दिला आहे, तो अत्यंतिक महत्त्वाचा आहे. संविधान हे जनताभिमुख असून, जनताच सार्वभौम आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन भारतीय संसदेची वाटचाल पुढे नेली पाहिजे. संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार; त्याचबरोबर कर्तव्याची जाण राज्यकर्त्यांना असणे हे खूप महत्त्वाचे वाटते, असे प्रतिपादन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांनी आज येथे केले. सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात ‘भारतीय संविधान आणि नागरिक’ या विषयावर आमदार रोहितदादा पवार यांचे व्याख्यान झाले. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे अध्यक्षस्थानी होते. महापालिका शिक्षण समितीचे सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी आमदार रोहितदादा पवार म्हणाले, की भारत एकसंघ राष्ट्र आहे, ही संकल्पना नव्या पिढीत रुजवून दृढ करणे गरजेचे आहे. नवतरुणांनी महापुरुषांचे संविधानिक आचरणात्मक आदर्श वारसा दिला पाहिजे. संविधान अभ्यासणे आणि त्याचा अर्थ समजावून घेणे ही काळाची गरज आहे. सुरवातीला संविधानाप्रति अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, बारामती पंचायत समितीचे माजी सभापती व पक्षनिरीक्षक करण खलाटे आदी उपस्थित होते. डॉ. मिलिंद बागूल यांनी प्रास्ताविक केले. बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. महापालिका शिक्षण समितीचे सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी अथर्व पब्लिकेशन्सचे युवराज माळी, कुमुद पब्लिकेशन्सच्या संगीता माळी, विजयकुमार मौर्य, दिलीप सपकाळे, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, डी. एम. अडकमोल, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, शिरीष चौधरी, राजेंद्र पारे, अनिल सुरळकर, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय ठाकूर, विजय कोसोदे, संजय पाटील, अभिषेक बागूल, राहुल निकम, भैय्यासाहेब देवरे, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, सुनील सोनवणे, शिवराम शिरसाठ, सुनील जाधव आदी सत्यशोधकी साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. गौरवान्वित सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात ‘मूकनायक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी, तसेच एरंडोलचे प्रगतिशील शेतकरी शालिकभाऊ गायकवाड, सामाजिक क्षेत्रात योगदानाबद्दल जळगावच्या इकरा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अब्दुल करीम सालार, प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नायब तहसीलदार लीलावती कोसोदे, जात पडताळणी समितीच्या सदस्या वैशाली हिंगे यांना आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.(दि.26/01/2021)