नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

धर्म क्या है, ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले

ज्येष्ठ सामाजिक ज्ञानेश्वर वंजारी यांचे चिरंजीव ज्ञानप्रभा ड्रायव्हिंग स्कूलचे संस्थापक किशोर वंजारी द्वारा लिखित धर्म क्या है या ग्रंथाचे प्रकाशन स्थानिक संताजी स्मृती धर्मशाळा गोरोबा मैदान येथे

धर्म क्या है ग्रंथाचे प्रकाशन नागपूर दिनांक 30 जुलै - ज्येष्ठ सामाजिक ज्ञानेश्वर वंजारी यांचे चिरंजीव ज्ञानप्रभा ड्रायव्हिंग स्कूलचे संस्थापक किशोर वंजारी द्वारा लिखित धर्म क्या है या ग्रंथाचे प्रकाशन स्थानिक संताजी स्मृती धर्मशाळा गोरोबा मैदान येथे नुकतेच संपन्न झाले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामटेक धर्म शाळेचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे होते . याप्रसंगी विचार मंचावर पुस्तकाचे विमोचन म्हणून समाजसेवक ज्ञानेश्वर वंजारी , चंद्रप्रभा वंजारी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जागतिक ख्यातीचे विचारवंत डॉ . रमेश राठोड व डॉ. रवींद्र किशोर वंजारी यावेळी उपस्थित होते . याप्रसंगी डॉ. रमेश राठोड यांनी पुस्तकाचे महत्व व्यक्त करताना सांगितली की समाजातील प्रत्येक नागरिकांनी धर्म काय आहे ?हे समजावून पाचारण केले तर समाजामध्ये न्याय, समता, बंधुता यांचा विकास . होऊन आधुनिक भारताची जडणघडण होऊ शकते . कार्यक्रमाचे संचालन किशोर वरपे तर आभार गिरीश पाहुणे यांनी मानले .(दि.30/07/2021)