नागपूर ता 11,ऑगष्ट,लोकजागृती मोर्चा तर्फे
ऑटोचालकांचे विभागीय आयुक्तांना निवेदन,
सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व ऑटोचालक, स्कूल व्हॅन चालक व कॅबचालक यांचा रोजगार पूर्णपणे बंद आहे त्यामुळे हे सर्व ऑटो, कॅब व व्हॅन चालक अतिशय भीषण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात आहेत या पार्श्वभूमीवर लोकजागृती मोर्चातर्फे मा. विभागीय आयुक्त श्री अनूप कुमार यांना मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता मागण्यांचे निवेदन लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष अँड. रमण सेनाड यांच्या नेतृत्वात देण्यात आले,यासंदर्भात लोकजागृती मोर्चाने महामहिम राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री केंद्रीय परिवहन मंत्री नितींजी गडकरी माननीय खासदार शरद पवार साहेब यांनादेखील मेल द्वारे निवेदन दिलेले आहे,
यावेळी श्री निरज सिंह, केशव (पप्पू) सातपुते, मंगेश साखरकर, अनिल मेंढे, प्रतिक्षित वैद्य, अनिल गुरुनुले, प्रकाश चौधरी, प्रकाश देवतळे, मिलिंद गजभिये, आनंद चौरे, महेश बुरबुरे, हेमंत गजभिये आदी ऑटो व व्हेन चालक उपस्थित होते.प्रमुख मागण्या
सर्व व्यवसाय ठप्प असल्यामुळे 31 डिसेंबर किंवा 31 मार्च 2021 पर्यंत खाजगी फायनान्स कंपन्या किंवा बँका यांनी कर्जाची मागणी करू नये
2 मार्च 20 ते मार्च 2021 या कालावधीतील इन्शुरन्स ला सरसकट एक्सटेन्शन देण्यात यावे त्याचे पैसे आम्हाला लागू नयेत मात्र इन्शुरन्स चे सर्व फायदे व कव्हरेज आम्हाला मिळावे
3 परमिट व पासिंग हे सरळ सरळ 2021 च्या मार्च पर्यंत वाढवून देण्यात यावे त्याकरिता कोणतीही रक्कम शासनाने आकारू नये
4 ज्याप्रमाणे दिल्ली व केरळ शासनाने ऑटो व्हेन चालकांना जगण्यायोग्य मानधन दिलेले आहे त्याच धर्तीवर या पुरोगामी महाराष्ट्र शासनाने आम्हाला मानधन द्यावे
5 त्याचप्रमाणे तोरणा काळात आमच्यावर झालेल्या कर्जाची परतफेड करण्याकरिता एक मुस्त रक्कम रुपये 10000 देण्यात यावे
6 केंद्र सरकारचे 20 लाख करोड केवळ रस्ते बांधणी किंवा उद्योजकांच्या घशात न घालता आमच्यासारख्या सामान्य गैर उद्योजक स्वयं व्यवसायिक गरजू लोकांना देण्यात यावा चला