नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

कुणबी संघाच्या अध्यक्षपदी जानराव केदार, सचिव अशोक पांडव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

कुणबी संघाच्या अध्यक्षपदी जानराव केदार तर सचिव अशोक पांडव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आज जयताळा मार्गावरील राही सभागृहात बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाची आमसभा खादी ग्रामोद्योग चे माजी संचालक साहेबराव जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,या वेळी प्रदीपभाऊ ठाकरे यांनी मार्गदर्शन केले ,पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,

कुणबी संघाच्या अध्यक्षपदी केदार तर सचिव पांडव, हिंगणा (ता २९):बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाच्या अध्यक्षपदी जानराव केदार तर सचिव अशोक पांडव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आज जयताळा मार्गावरील राही सभागृहात बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाची आमसभा खादी ग्रामोद्योग चे माजी संचालक साहेबराव जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेला व्यवसाय शिक्षण मंडळाचे माजी संचालक खुशालराव गेडाम, संघटनेचे अध्यक्ष सुरेश गुडधे, सचिव प्रदीप ठाकरे,राही ग्रुपचे विजय राऊत,नरेश बरडे,ऍड रेखा बाराहाते, वृंदा ठाकरे ,रमेश ठवळे,नंदकिशोर गोहणे,मनोहर ठवळे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेत संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यात अध्यक्ष जानराव केदार, उपाध्यक्ष रमेश ठवळे, सचिव अशोक पांडव, कोषाध्यक्ष वामनराव येवले व सहसचिव नरेश शेळके यांच्यासह २१ पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक सचिव प्रदीप ठाकरे यांनी केले.तर आभार आरती बाळसराफ यांनी मानले. सभेला राजेंद्र वानखेडे, भाऊराव आमले, राकेश पन्नासे,अशोक चौधरी, सुरेश लांबट, श्रीधर नाहते, रमेश राऊत, अर्चना बरडे, मंदा बोबडे, रवि गोतमारे, सुरेश वसू, राजेश काकडे,मनोहर आवारी, नारायण कोहळे, दीपक दुधाने, गजानन शिवरकर यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.(दि.30ऑगष्ट 2021)