नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

जळगाव येथे गोलाणी व्यापारी संकुलासमोरील हनुमान मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन करताना आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते.

जळगाव येथे, मंदिरे उघडण्यासाठी सोमवारी भाजपच्या जिल्हा महानगर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे गोलाणी व्यापारी संकुलाजवळील हनुमान मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) तथा आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली

जळगाव येथे गोलाणी व्यापारी संकुलासमोरील हनुमान मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन करताना आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते. मंदिरे उघडण्यासाठी जळगावात शंखनाद भाजपतर्फे आंदोलन; सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. जळगाव दि.30ऑगष्ट :- करोनाच्या प्रादुर्भावात मंदिरे बंद करण्यात आली होती; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, या काळात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, मंदिरे उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरात भाजपच्या जिल्हा महानगर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर (30 ऑगस्ट) राज्य सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यात आला. करोना काळात मागील अनेक दिवसांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी सोमवारी भाजपच्या जिल्हा महानगर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे गोलाणी व्यापारी संकुलाजवळील हनुमान मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) तथा आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष हेमंत जोशी यांच्या उपस्थितीत शंखनाद आंदोलन करण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव कमी असतानादेखील ठाकरे सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी दिलेली नाही. मंदिरे बंद असल्याने लाखो गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून भाजपच्या जिल्हा महानगर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसर दणाणला होता. दरम्यान, सांस्कृतिक आघाडीतर्फे सांस्कृतिक आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विशाल जाधव आणि अध्यक्ष भावेश पाटील यांनी पोवाडा सादर केला. आंदोलनात जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, दीपक साखरे, जीवन अत्तरदे, रेखा कुलकर्णी, निला चौधरी, वंदना पाटील, सोशल मीडियाचे अक्षय चौधरी, गणेश माळी, धीरज वर्मा, कार्यालयमंत्री प्रकाश पंडित, नगरसेविका शुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, रेखा पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद सपकाळे, कुमार श्रीरामे, जयेश भावसार, दीपक बाविस्कर, लता बाविस्कर, भूषण लाडवंजारी, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, किसन मराठे, केदार देशपांडे, अजित राणे, अनिल जोशी, विनोद मराठे, लक्ष्मण धनगर, चेतन शर्मा, तृप्ती पाटील, शालू जाधव, मिलिंद चौधरी, महेश पाटील, विक्की सोनार, स्वामी पोतदार, अश्विन सैंदाणे, सागर जाधव, प्रतीक शेठ, मयूर भोई, गौरव पाटील, भूषण पाटील, महेश लाठी, पंकज गागडे यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.(दि.30ऑगष्ट 2021)