नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

समाधा आश्रम तर्फे जयपुर फुट शिबिर व निःशुल्क वितरण १७ संप्टेबंर पासून

मार्गदर्शनाद्वारे उपयुक्त जयपुर फुट शिबिर व निःशुल्क वितरण १७ ते १९ संप्टेबंर पंर्यत पुज्य समाधा आश्रम, जरीपटका येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चंद्रकुमार टेकचंदानी यांनी दिली

समाधा आश्रम तर्फे जयपुर फुट शिबिर व निःशुल्क वितरण १७ संप्टेबंर पासून नागपूर दि.5सप्टेंबर :- ब्रम्हलीन पूज्य सदगुरू स्वामी शिवभजन महाराज यांच्या स्मृति प्रित्येर्थ ,गद्दीनशीन पूज्य स्वामी नारायण भजन महाराज यांच्या आर्शिवादाने व मार्गदर्शनाद्वारे उपयुक्त जयपुर फुट शिबिर व निःशुल्क वितरण १७ ते १९ संप्टेबंर पंर्यत पुज्य समाधा आश्रम, जरीपटका येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चंद्रकुमार टेकचंदानी यांनी, नॅशनल मिडिया न्यूजला दिली. या शिबिरात २०० दिव्यांग व्यक्तीना जयपूरवरून येणाऱ्या तंज्ञ डॉक्टरांकडून तपासून त्यांचा आवस्यकते नुसार जयपुर फुट व कैलिपर्स, जूते, बैसाखी, स्पलिंटस तयार करून निःशुल्क वितरण करण्यात येईल. बाहेर गावावरून येणाऱ्या दिव्यांगा करीता जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात आली असून नागरीकांनी १२ संप्टेबर पंर्यत समाधा आश्रम, बॅक कॉलोनी, जरीपटका नागपूर येथे नोंदणी करून याचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन टेकचंदानी यांनी केले.पत्रपरिषदेला दर्शनलाल थावरानी, मोहन सचदेव, नंदलाल चेलानी, दिलीप हेमराजानी, महेश इसरानी आदी उपस्थित होते.(दि.06 सप्टेंबर2021)