नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

डिंगडोह -निलडोह भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार समीर मेघेच पात्र असल्याचे हिंगणा मतदारसंघात सर्वदुर दिसून येत आहे. त्याचीच प्रचिती म्हणुन, दिनांक.15 सप्टेंबर रोजी डिगडोह व निलडोह भाागातील राष्ट्रवादी पक्षातील मोठया संख्येने युवकांनी समीर मेघे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश

डिंगडोह -निलडोह भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश नागपूर, हिंगणा दि.१५ सप्टेंबर:- भाजप आमदार समीर मेघे यांच्या काम करण्याच्या शैलीवर दिवसें-दिवस जनतेसोबतच अन्य पक्षातील कार्यकर्त्याचा विश्वास द्विगुणीत होत आहे. समीर मेघे हे एक धडाडीचे व लोककल्याणासाठी सतत झटणारे नेते असून राज्यातील आघाडी सरकार त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी जाणूनबाजुन निधी देत नसल्याची जन सामान्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच अन्य पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सुध्दा मोठी नाराजी आहे. त्यांच्या विश्वासास आमदार समीर मेघेच पात्र असल्याचे हिंगणा मतदारसंघात सर्वदुर दिसून येत आहे. त्याचीच प्रचिती म्हणुन, दिनांक.15 सप्टेंबर रोजी डिगडोह व निलडोह भाागातील राष्ट्रवादी पक्षातील मोठया संख्येने युवकांनी समीर मेघे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे हिंगणा मतदारसंघात भाजपाची व पर्यायाने आमदार समीर मेघे यांची बाजु अधिक सक्षम झाली आहे व पूढे देखील होईल असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.  दिनांक 15.09.2021 रोजी आमदार समीर मेघे यांच्या उपस्थितीत खुशाल बोपचे, संतोष चव्हाण, बल्लु पाटील, रमेश प्रधान, मंगेश पटले, सदाशिव शेट्टी, प्रकाश मेश्राम, राजे लिल्हारे, दिपक प्रसाद, खुशाल उरकुडे, विष्णु चव्हाण, रोधेश्याम येनकर, शंकर काळे, विकास धारगावे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यावेळी भाजपचे नेते अंबादास उके, विनोद ठाकरे, राजेंद्र हरडे, सुरेश काळबांडे, कैलास गिरी, आदर्श पटले, चेतनलाल पांडे, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.(दि.15 सप्टेंबर 2021)