नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

पवार समाज संघटनेच्या वतीने सुधीर दिवे यांचा सत्कार

सुधीर दिवे यांचा पवार समाज संघटना तर्फे त्यांच्या जन्मदिनी नुकताच सत्कार करण्यात आला असून अखिल भारतीय भोयर पवार महासंघ व युवा भोयर पवार मंच नागपूर या दोन्ही संघटनेच्या वतीने सुधीर दिवे यांचा सत्कार

.नागपूर दि..21सप्टेंबर::- पवार समाज संघटनेच्या वतीने सुधीर दिवे यांचा सत्कार सुधीर दिवे यांचा पवार समाज संघटना तर्फे त्यांच्या जन्मदिनी नुकताच सत्कार करण्यात आला असून अखिल भारतीय भोयर पवार महासंघ व युवा भोयर पवार मंच नागपूर या दोन्ही संघटनेच्या वतीने सुधीर दिवे यांचा सत्कार जन्मदिनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला. पवार जाती शब्द केंद्रीय ओबीसी सूची मध्ये अनावधाने वगळण्यात आला. पवार शब्द पूर्ववत सूची मध्ये जोडण्या करिता मा. सुधीरजी दिवे यांचे माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांची पवार समाजातील प्रतिनिधी यांनी भेट घेतली व श्री दिवे सर आणी श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे माध्यमातून पवार जात शब्द हा विषय लवकरच निकाली निघेल अशी आशा आहे. हरिश्चंद्र ढोबाळे कला शिक्षक यांनी दिवे सरांचे रेखाटलेले रेखा चित्र याप्रसंगी भेट करण्यात आले. तसेच समाजाचे मुखपृष्ठ वाटचाल व सुरेश देशमुख लिखित भोयरी संस्कृती हे पुस्तकं भेट स्वरूप दिले. याप्रसंगी डॉ. नामदेव राऊत अध्यक्ष अखिल भारतीय भोयर पवार महासंघ. श्रावण फरकाडे अध्यक्ष युवा भोयर पवार मंच. मधुकर चोपडे महामंत्री अ.भा.भो.प.महासंघ. मोरेश्वर भादे सचिव अ.भा.भो.प. महासंघ. सुरेश देशमुख सरंक्षक युवा भो. प. मंच.अजय फरकाडे कार्याध्यक्ष युवा भो.प.मंच. हरिश्चंद्र ढोबाळे कला शिक्षक. किशोर चोपडे अध्यक्ष युवक आघाडी व इतर समाजबांधव उपस्थित होते.(दि.21सप्टेंबर 2021)