नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

भारतरत्न लता मंगेशकर यांना , लता मंगेशकर हॉस्पीटलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली:-डॉ.आशिष देशमुख

भारतरत्न, आदरणीय लता मंगेशकर यांच्या निधनाची वार्ता कळताच दुःख झाले. आमच्यासाठी त्या प्रेरणादायी होत्या. त्यांच्या नावाने हॉस्पीटल सुरू करण्यास त्यांनी होकार दिला

लता मंगेशकर यांच्या निधनावर लता मंगेशकर हॉस्पीटलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली:-डॉ.आशिष देशमुख नागपूर दि.6 फेब्रुवारी:- भारतरत्न, आदरणीय लता मंगेशकर यांच्या निधनाची वार्ता कळताच दुःख झाले. आमच्यासाठी त्या प्रेरणादायी होत्या. त्यांच्या नावाने हॉस्पीटल सुरू करण्यास त्यांनी होकार दिला होता, म्हणूनच 32 वर्षांपूर्वी लता मंगेशकर हॉस्पीटल या नावाने नागपूर येथे भव्य रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यांच्या नावाची जगातील ती एकमेव संस्था आहे. भारतरत्न, पद्मभूषण, दादासाहेब फाळके, फिल्म फेअर लाईफ टाईम अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी लता दिदींना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे देशाची तसेच आमची व्यक्तिगत अपरिमित हानी झाली असून लता मंगेशकर हॉस्पीटलचे मॅनेजमेंट, डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो", अशी दुःखद प्रतिक्रिया लता मंगेशकर हॉस्पीटल, नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.(दि.06/02/2022)