नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

लोखंडे नगरात पंधरा लाख रुपयांचे, विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

नगरसेवक व क्रिडा सभापती प्रमोद तभाने यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या पुढाकाराने 15 लाख रुपयांचे रोड डांबरीकरण विकास कामाचे भूमीपूजन

लोखंडे नगरात पंधरा लाख रुपयांचे डांबरीकरण विकास कामाचे भूमिपूजन संपन्न नागपूर : दि. ४ मार्च :-लोखंडे नगर प्रभाग ३७ येथे, नगरसेवक व क्रिडा सभापती प्रमोद तभाने यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या पुढाकाराने 15 लाख रुपयांचे रोड डांबरीकरण विकास कामाचे भूमीपूजन दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष किशोर वानखडे, माजी नगरसेवक विवेक तरासे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, मंडळाचे महामंत्री गोपाल बोहरे प्रभाग संयोजक, विमल कुमार श्रीवास्तव,  बंडूजी गायकवाड, शंतनू येरपुडे, नितीन महाजन, नंदूजी मानकर, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मधुकरराव महल्ले, विवेक मेंढी, सौ.अनुसयाताई गुप्ता, सौ. ज्योतीताई नाकतोडे, नामदेव जमेवार,  नाथाभाई पटेल, आसाराम शेंडे, जितेंद्र कबले, योगेश थापे, जितेंद्र म्हैसकर, शबानाताई, योगेश बांरगे, विनायकराव भिलकर, रामराव गांवडे, जितेंद्र पौनिकर आदी मंडळी उपस्थित होती.(दि.04/03/2022)