नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

पाण्याची समस्या सोडविण्याकरीता निदर्शन कार्यक्रम धरमपेठ झोन क्र 2 येथे, माजी नगरसेवक, सुनिल हिरणवार

पाण्याची समस्या सोडवण्याकरीता आज दिनांक 4 एप्रिल सोमवार, रोजी सुनिल हिरणवार यांच्या तर्फे संबंधीत विभागाला सुचना पत्र सादर करण्यात आले

नागपूर दिनांक 4 एप्रील:- पश्चिम नागपूर येथील पाण्याची समस्या सोडविण्याकरीता निदर्शन कार्यक्रम धरमपेठ झोन क्र 2 ओसीडब्लु कार्यायल, मागील 40 दिवसांपासून धरमपेठ, गिरिपेठ, गोकुलपेठ, झेंडा चौक, गवलीपूरा, काछीपूरा, रामदासपेठ, वसंतराव नाईक तसेच पश्चिम नागपूरातील अनेक रहिवाशी वस्त्यांमध्ये मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्येने विकराल रूप धारण केले आसून यावर त्वरीत उपाययोजना करण्याकरीता माजी नगरसेवक सुनिल हिरणवार सभापती असतांना नगरसेवक संजय बंगाले यांच्या सह वाटरवर्क चे संबंधीत अधिकाऱ्यां सोबत धरमपेठ झोन मध्ये बैठक घेतली. पण या गंभीर समस्येकडे आज तारखे पर्यंत कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. तेव्हा पुन्हा नगरसेवकचा कार्यकाल संपल्यावर सुद्धा नागरिकांसमावेत ओसीडब्ल्यू कार्यालयात सुनिल हिरणवार व संजय बंगाले यांनी चर्चा केली. परंतू पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी कुठलीही पहल झालेली दिसत नाही. जेव्हा कि 24 x 7 ची योजना असतांना सुद्धा नागरिकांना 2 तास सुद्धा पाणी मिळत नाही. आता तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून नागरीकांना पाण्याशिवाय जिवनयापन करणे असहनीय होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष उग्रस्वरूप धारण करत आहे. उपरोक्त समस्या सोडवण्याकरीता आज दिनांक 4 एप्रिल सोमवार, रोजी सुनिल हिरणवार यांच्या तर्फे संबंधीत विभागाला सुचना पत्र सादर करण्यात आले आहे. यावरही पाण्याची समस्या सोडविण्यात आली नाही तर नाईलाजास्वत OCW झोन कार्यालय, V.I.P. रोड धरमपेठ येथे श्री संजय बंगाले महामंत्री भाजपा व सुनिल हिरणवार माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वात प्रभागातील नागरिकांसह बुधवार, दि. 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता निदर्शन करण्यात आले . (दि.06/04/2022)