नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

महाकवी भास्कर सुमन ज्ञानपीठ पुरस्कार वितरण सोहळा 24 एप्रील रविवार या दिवशी

या वर्षीचा पुरस्कार, मराठी साठी प्रसिद्ध जेष्ठ पत्रकार व नाटककार प्रभाकर दुपारे कवियत्री डॉ. ज्योती नागपूरकर तर हिंदीसाठी डॉ. बाळकृष्ण महाजन, कृष्णकुमार त्रिवेदी

महाकवी भास्कर सुमन ज्ञानपीठ पुरस्कार वितरण सोहळा 24 एप्रिलला, मराठी आणि हिंदी साहित्यिकांना देण्यात येणारा iसायंकाळी 5:30 वाजता. सीताबर्डी येथील हिंदी साहित्य संमेलन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी मराठी साठी प्रसिद्ध जेष्ठ पत्रकार व नाटककार प्रभाकर दुपारे कवियत्री डॉ. ज्योती नागपूरकर तर हिंदीसाठी डॉ. बाळकृष्ण महाजन, कृष्णकुमार त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ.पुरण मेश्राम, आमदार विकास ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे प्रा.डॉ. मंगेश बनसोड सामाजिक कार्यकर्त्या लता उमाकांत ढोक, प्रसिद्ध वक्ते सविता मिश्रा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. हाकार्यक्रम मूकनायक इंडिया टीव्ही, अक्षर फाउंडेशन ट्रस्ट आणि मुक्ती एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मुख्य संयोजक आर. प्रमोद यांनी आवाहन केले आहे.(दि.22/04/2022)