नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

योग साधना भारतीय संस्कृतीचे प्रतिक - डॉ. संगीता भिसे

योग डे निमित्त योगाभ्यासाला सुरूवात माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरोचा उपक्रम

नागपूर दिनांक :-13 योग साधना भारतीय संस्कृतीचे प्रतिक - डॉ. संगीता भिसे योग डे निमित्त योगाभ्यासाला सुरूवात माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरोचा उपक्रम वर्धा, दि. 13 - पाश्चात्य संस्कृतीचे दृष्परीणाम लक्षात आल्यामुळे अनेक लोक योग साधने कडून वळून आपली प्रकृती सुदृढ बनवित आहेत. जागतिक योगा डे ला भारतीय संस्कृतीचे प्रतिक म्हणून संपुर्ण विश्वाने स्विकारले आहे, असे प्रतिपादन सामान्य रूग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संगीता भिसे यांनी आज येथे केले. जागतिक योगा डे निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, वर्धा आणि परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रूग्णालय यांच्या मार्फत झांशी राणी चौकातील परिचारिका प्रशिक्षण विद्यालयात योगाभ्यास कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. पराडकर, योगा प्रशिक्षक विजेंद्र दिक्षीत, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारचे वर्धा येथील क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सुनतकरी उपस्थित होते. दरवर्षी 21 जून रोजी योगा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून वर्धा येथे योगाभ्यासाला सुरूवात करण्यात आली आहे. डॉ. भिसे म्हणाल्या की, भारत सरकारने योगा डे हा अत्यंत छान उपक्रम सुरू केला आहे. दररोज योगा केल्यामुळे अनेक आजारांना आळा घालणे शक्य आहे. त्यामुळे नागरीकांना योगा करण्याकडे भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. पराडकर म्हणाले, दररोज योगा करणे ही सवय प्रत्येक नागरीकांनी लावणे आवश्यक आहे. योगा आणि प्राणायामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी योग प्रशिक्षक विजेंदर् दिक्षीत यांनी योगा व ध्यान साधनेचे विविध प्रात्याक्षिके करून दाखवून उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमात सामान्य रूग्णालय व परिचारिका प्रशिक्षण विद्यालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन श्रीमती वैशाली झाडे यांनी केले. तर आभार जयश्री मिसाळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धाचे संतोष यादव, परिचारिका प्रशिक्षण विद्यालयाचे कल्पना वलगावकर, नर्मदा गवई, अनिल टाले, वैशाली झाडे, पल्लवी बरडे, जयश्री मिसाळ, रेखा तडस, आरती कुडे, संगीता काकडे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.(दि13/05/2022)