नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मातृशक्ती चा जागर अपघातमुक्त राहो प्रत्येक घर

मातृ शक्तीचा जागर अपघातमुक्त राहो प्रत्येक घर, या अभिनव कार्यक्रमाला सावित्री पथकाच्या rto महिला अधिकारी माननीय शिवज्योति भांबरे, मा. मंजुषा भोसले, मा. टिकले , मा.मनोज मुरकुटे अदी मान्यवरांची उपस्थिती

मातृशक्ती चा जागर, अपघातमुक्त राहो प्रत्येक घर नागपूर दि ,7 जुन :- मातृशक्ती चा जागर अपघातमुक्त राहो प्रत्येक घर ,हा उपक्रम अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला या लोकचळवळी चा एक भाग आहे. संभाजी चौक हा ग्रे स्पॉट आहे. आणि ह्या परिसरातील इंगळे ले आऊट आणि बंडू सोनी ले आउट परिसररातील नागरिकांनी काटेकोरपणे वाहतूक नियम पाळले पाहिजे याकरिता आय रास्ते आणि रोडमार्क संस्था प्रयत्न करीत आहे. रस्ते अपघात म्हटला की रक्ताने माखलेला गंभीर जखमी डोळ्यासमोर येतो. असा अपघात कुणाचाही होऊ नये ,आणि कुणीही आशा रस्ते अपघाताला कारणीभूत ठरू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परन्तु कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अशाप्रकारची दुखापत झाल्यास सर्वात जास्त त्रास आणि दुःख मातृशक्तीला होत असतो,आणि म्हणून आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याने काटेकोरपणे वाहतूक नियम पाळावे,वाहतूक नियम पाळणे ही आपाली जीवन पद्धती, A way of life, जीवनशैली बनवावी याकरिता मातृशक्तीची भूमिका कशी असावी , याकरिता मातृ शक्तीचा जागर अपघातमुक्त राहो प्रत्येक घर, या अभिनव कार्यक्रमाला सावित्री पथकाच्या rto महिला अधिकारी माननीय शिवज्योति भांबरे, मा. मंजुषा भोसले, मा. टिकले साहेब, आय रास्ते चे प्रतिनिधी मा.मनोज मुरकुटे, रोडमार्क चे संस्थापक डॉ राजू वाघ, पाटणकर काकू,महाजन काकू आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते , यावेळी rto अधिकारी माननीय शिवज्योति भांबरे,आणि मंजुषा भोसले यांनी वाहतूक नियमांबाबत माहिती सांगितली तर डॉ राजू वाघ यांनी मातृशक्तीचा जागर का आवश्यक आहे , आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याने काटेकोरपणे वाहतूक नियम पाळले पाहिजे ह्याबाबत मातृशक्तीने परिवारातील सदस्यांना मार्गदर्शन करीत राहिले पाहिजे ,अधूनमधून रस्ता सुरक्षावर मुलाबाळांशी चर्चा केली पाहिजे ,माझा परिवार अपघातमुक्त परिवार ही संकल्पना जोपासली आणि घरचग प्रत्येक सदस्याणे वाहतूक नियम पाळले तर मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांवर नक्कीच नियंत्रण आणता येईल अशी माहिती प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे संचालन विद्या बुटले यांनी केले तर आभार नितीन महाजन यांनी मांडले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रवीण पाटील, अतुल इंदाने, उमराव बोबडे,उज्वल खोपकर ,अनिल वाघ, यांनी सहकार्य केले.विनीत डॉ राजू वाघ,नितीन महाजन.(दि.07/062022)