स्लम भागात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्र, लेडिज अँड जेन्ट्स द्वारा स्लम भागात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न
नागपूर: दिनांक 7 जून 2022 :- रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने म्हसाळा, कामठी रोड येथील स्लम भागात महीलांसाठी व्यसनांबाबत जागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यातील सर्वप्रथम वैशाली उके ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन यशस्वितेसाठी सहकार्य केले. केंद्राचे समुपदेशक तथा मनोविकारतज्ञ अनंत घुलक्षे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनांपासून दूर स्वतःला ठेवण्यासाठीचे उपाय सांगून मार्गदर्शन करुन उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिले. त्याच बरोबर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केल्या गेले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका प्रांजली ताल्हन यांचे मार्गदर्शन तसेच प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती केंद्राचे सचिव सुरेश वांढरे, अनंत घुलक्षे, पुजा मानमोडे, लक्ष्मीताई सावरकर, नंदाताई देशमुख, उज्वला कदम, वृंदाताई ठाकरे, सविता तायवाडे, लीनाताई कटरे, तसेच बऱ्याच मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला. (दि.07/06/2020)