नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

उठ तरुणा जागा हो अपघातमुक्तीचा धागा हो मशाल मार्च जनजागृती रॅली

संभाजी चौक आय टी पार्क रोड बंडू सोनी ले आऊट येथे , उठ तरुणा जागा हो अपघातमुक्तीचा धागा हो मशाल मार्च जनजागृती रॅली काढण्यात आली

उठ तरुणा जागा हो,अपघातमुक्ती चा धागा हो उठ तरुणा जागा हो अपघातमुक्तीचा धागा हो नागपूर, दिनांक 16 जून 2022 ला सायंकाळी ठीक 6:30 वाजता संभाजी चौक आय टी पार्क रोड बंडू सोनी ले आऊट येथे , उठ तरुणा जागा हो अपघातमुक्तीचा धागा हो मशाल मार्च जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून काढण्यात आली . कार्यक्रमाचे आयोजन रोडमार्क आणि आयरास्ते संस्था , कमांडो जिम आणि जिम यांनी केले, कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ तरासे,सामाजिक कार्यकर्ते नरेश जुंमानी, नितीन महाजन,प्रामुख्याने उपस्थित होते. देशात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होत असतात यात दीड लाख नागरिक मृत्युमुखी पडतात तर साढे तीन लाख नागरिक कायमचे दिव्यांग होत असतात, या रस्ते अपघाताला 85 ते 90 टक्के मानवी चूक करणारे लोक कधी बळी पडतात तर कधी रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत असतात, यात तब्बल 76 टक्के युवक आहेत .तेव्हा युवकांकडून होणाऱ्या मानवी चुकांवर नियंत्रण आणण्याकरिता *उठ तरुणा जागा हो, अपघातमुक्ती चा धागा हो ,या उपक्रमातून जनजागृती जनजागृत 3 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Iraste ने संभाजी चौक हा ग्रे स्पॉट म्हणून म्हणून घोषित केला त्यानुसार बंडू सोनी ले आऊट परिसरातील प्रत्येक कुटुंब या अभियानात सहभागी करून घ्यायचा आहे त्यानुसाठी कर्त्या व्यक्तीची भूमिका मातृशक्तीचा जागर,अपघात मुक्त राहो प्रत्येक घर ,आणि उठ तरुणा जागा हो अपघातमुक्ती चा धागा हो अशाप्रकारे प्रत्येकाला अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला लोकांना शिकविण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन आणि अनुसंधान केंद्र चे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे सदस्य डॉ राजू वाघ यांनी माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ तरासे, विवेक मेंढी,नितीन महाजन, प्रवीण पाटील, एन्ड्युरन्स फिटनेस क्लब चे सुशील कमलाकर,उमराव बोबडे,अतुल इंदाने,अनिल वाघ,उज्वल खोपकर,अथर्व काठोते,वनवांशी काका, विनय राऊत, वृषभ कमलाकर,सुदीप माईटी, ज्वाला सिंग ,सुनील यादव वरद जोशी यांचे सहकार्य मिळाले, तरी वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही नम्र विनंती.(दि,16/06/2022)