नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

योग संपदा आणि गांधीसागरउद्याना ची योग रैली

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर देश अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव उल्हासात साजरा करीत आहे. या निमित्ताने यंदा २१ जुन ला आंतरराष्ट्रिय योग दिवसावर योग संपदा

योग संपदा आणि गांधीसागर उद्यानाची योग रैली नागपूर दि.21जुन:- स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर देश अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव उल्हासात साजरा करीत आहे. या निमित्ताने यंदा २१ जुन ला आंतरराष्ट्रिय योग दिवसावर योग संपदा आणि गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दोनशे योग साधक आणि साधीकांची रैली काढुन वेगवेगळ्या ठिकाणी योगाच्या प्रत्याक्षिकांतुन जनजागृती केली आणि चौकात येणा-या संत आणि महान विभुतीच्या पूतळयांना माल्यापर्ण करून कृतज्ञता व्यक्त केली. या रैलीला पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने योग संपदा चे मुख्य योग शिक्षक गंगाधर पोडल्लीवार, योग शिक्षक किशारे चरडे, डॉ. राजेन्द्र चौधरी, बाबा शेंडे, श्रीकुमार मुंधडा, विनोद झाडे , वर्षा महाकाळकर, नुतन पलांदुरकर, शालिणी तलमले, संस्था के अध्यक्ष नेरकर, प्रकाश बेतावार, रवी सुर्यवंशी और गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था के अध्यक्ष राजेश कुंभलकर, नंदु लेकुरवाळे, पितांबर लुटे, मुकुंद पडवंशी, हट्टी गुरुजी, मिनाताई भुते, योग शिक्षीका विद्याताई चौहान, अर्चना शिवणकर, यांसर्वाचा योगदान होता.(दि.21/06/2022)