नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

आयब्लॉकच्या माध्यमातून पत्रकार भवनात सौदर्यीकरणाची सुरुवात

पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या आमदार निधीतून नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक पत्रकार भवनात आयब्लॉक (गट्टू) लावण्याच्या कामाची सुरुवात

आयब्लॉकच्या माध्यमातून पत्रकार भवनात सौदर्यीकरणाची सुरुवात नागपूर,दि.7जुलै :- पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या आमदार निधीतून नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक पत्रकार भवनात आयब्लॉक (गट्टू) लावण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली . पत्रकार भवनचे ट्रस्टी आणि व्यवस्थापक प्रभाकर दुपारे, विनोद देशमुख यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून टिळक पत्रकार भवनाचे सौंदर्यीकरण देखील करण्यात येत आहे. यावेळी ट्रस्टी विवेक पुराडभट्ट, विकास ठाकरे यांचे खाजगी सचिव गौरव चव्हाण व सत्यमजी आणि पत्रकार भवनातील कर्मचारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कामामुळे पत्रकार भवनाच्या सौदर्यात भर पडेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.(दि.07/07/2022)