नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

जो ओबीसीकी बात करेगा ,वही देशपे राज करेगा, राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष डाॕ.बबनराव तायवाडे

ओबीसींच्या हितासाठी काहीच केले नाही.आता ओबीसी हा जागृत होऊन एकत्र येत आहे.आणि म्हणुन यापुढे जो ओबीसीकी बात करेगा वही देशपे राज करेगा असा इशारा

जो ओबीसीकी बात करेगा वही देशपे राज करेगा - डाॕ.तायवाडे नागपूर-हिंगणा,दि.29 जुलै :- प्रत्येक माणुस स्वतःसाठी जगत आहे.परंतु जे समाजकल्याणासाठी जगतात त्यांना वेगळाच आनंद मिळतो.प्रत्येक पक्षांनी ओबीसींच्या भरवशावर सत्ता भोगली.पण ओबीसींच्या हितासाठी काहीच केले नाही.आता ओबीसी हा जागृत होऊन एकत्र येत आहे.आणि म्हणुन यापुढे जो ओबीसीकी बात करेगा वही देशपे राज करेगा असा इशारा राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष डाॕ.बबनराव तायवाडे यांनी दिला.औद्योगिक परिसरातील पारधीनगर येथे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा कार्यालयाचे डाॕ.तायवाडे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रिय युवा अध्यक्ष सुभाष घाटे,ओबीसी महासंघाच्या जिल्हा प्रभारी तथा जिप सभापती उज्वला बोढारे, प्रसिद्ध उद्योजक प्रभाकर देशमुख ,जिल्हाध्यक्ष राजु चौधरी,जिप सदस्या रश्मीताई कोटगुले ,कुंदाताई राऊत,सभापती रुपाली खाडे,विदर्भ उपाध्यक्ष प्रा.सुरेंद्र मोरे,बाळासाहेब वाघमारे,कार्याध्यक्ष रवी देशमुख ,जिल्हा महिला अध्यक्षा निशाताई खडसे,महासचिव प्रिती राऊत,युवा अध्यक्ष शरद वाटकर ,जिल्हा सचिव तथा सरपंच रविंंद्र आदमने ,संघटक दिलीप राऊत,युवा महासचिव तथा राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष आशिष पुंड,डिगडोह ग्रामपंचायत सरपंचा इंद्रायनी काळबांडे ,पंचायत-समिती सदस्य लिलाधर पटले,उमेशसिंह राजपुत,दक्षिण-पच्छिमचे अध्यक्ष ललितराव देशमुख ,ज्येष्ठ पत्रकार लिलाधर दाभे,गजानन ढाकुलकर ,हिंगणा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर राऊत ,महिला अध्यक्षा सायली थोटे व युवा अध्यक्ष उमेश राऊत उपस्थित होते.ओबीसी बांधवांनी आता थेट जेसिबी प्रमाणे आपले वर्तन आणि आपले विचार मांडले पाहीजे .जेसिबी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर .याच महापुरुषांच्या विचारांचा धागा ओबीसींच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे रोखठोक विचार सभापती उज्वला बोढारे यांनी मानले.सुरेश काळबांडे यांनी राजु चौधरी यांच्या कार्याचा आढावा सादर केला.संचालन महिला महासचिव प्रिती राऊत यांनी तर आभार राजु चौधरी यांनी मानले.यावेळी बापु बोढारे,प्रविण खाडे,शशिकांत थोटे,अतुल देशमुख ,अनिल मारोडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(दि.29जुलै 2022)