नागपूर दिनांक,20 :- अखिल भारतीय जनवादी महिला समितीतर्फे देशभरात महिलांवरील होत असलेल्या अन्याय, अत्याचारा विरोधात 20 आगस्ट रोजी, आंदोलन करण्यात आले. जनवादी महिला समितीच्या नागपूर जिल्हाध्यक्ष मंगला जुनघरे व उपाध्यक्ष प्रीती मेश्राम यांच्या नेतृत्वात सुभाष रोड येथे खंडोबा देवस्थान समोर अखिल भारतीय जनवादी महिला समितीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. गुजरात मधील बिल्कीस बानो बलात्कार घटनेच्या अकराही आरोपींना स्वतंत्रदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिला सुरक्षा व महिला सन्मानावर भाषण दिले. त्यानंतर लगेच बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली. यापूर्वी मानवाधिकार कार्यकर्त्या, तिस्ता सितलवाड यांना गुजरात एटीएस ने अटक केली होती तसेच भंडारा येथे एका महिलांवर दोन वेळा पाशवी सामूहिक बलात्कार करण्यात आला. राजस्थान येथील शालेय दलित विद्यार्थी इंद्र मेघवालाने सवर्ण शिक्षकांच्या पाण्याला स्पर्श केला म्हणून मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात तसेच राशन जीवनाशक वस्तू वितरण या मागणीस घेऊन जनवादी महिला समितीतर्फे हस्तक्षर मोहीम राबविण्यात आली होती. हस्ताक्षर प्रतिसहित हे निवेदन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. वरील आंदोलनात बिल्किस बानोच्या अपराध्यांची माफी रद्द करा. इंद्र मेघवाला च्या आरोपीस फाशी द्या. तिस्ता सितलवाड यांची सुटका करा. दलित महिला व आदिवासी यांच्यावरील अत्याचार थांबवा, महागाई बेरोजगारीवर लगाम लावा, रेशन व्यवस्थेची सार्वत्रिकरण करा. अशा घोषणा देऊन तीव्र निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात 60 ते 70 महिला उपस्थित होत्या.(दि.20ऑगष्ट 2022)