नागपूर येथे दिनाक. 1 सप्टेंबर 2022 :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आंदोलन, संविधान चौक येथील आज गुरूवारी 1 सप्टेंबर रोजी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर च्यावतीने आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांचे संदर्भात केलेले अपमान कारक वक्तव्य याचा निषेध व शिक्षकांचे शाळेत फोटो लावण्याचा शासकीय आदेश याचा निषेध करण्याकरीता संविधान चौक नागपूर येथे सायं. 4 ते 5 या वेळेत तीव्र निदर्शने करण्यात आली. या नंतर शिक्षणाधिकारी मा. काटोलकर यांच्या मार्फत शिक्षण मंत्र्याच्या नावे निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विमाशिसंघ नागपूरचे अध्यक्ष विठ्ठल जुनघरे यांनी केले. यावेळी आंदोलनात अविनाश बडे, दिलीप बोके, रमेश काकडे, संजय वारकर, प्यारेलाल लोणारे, राजेश गौरे, राकेश दुम्पलवार, वामन सोमकुंवर, देवराव मांडवकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
(दि.01सप्टेंबर 2022)