नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

विदेशी कंपन्या बद्दल, होत असलेला करार तुरंत थांबवा सचिन पाटील

पालिका कंत्राटदार कंपनीशी करार करणार आहे. हा प्रकल्प चालवण्यासाठी कोणत्याही परदेशी कंपनीला देण्यास अपनी प्रजाहित पार्टीने विरोध केला

नागपूर.दिनांक 2सप्टेंबर :- कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाईल. नेदरलँड येथील कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. या महिन्यात पालिका कंत्राटदार कंपनीशी करार करणार आहे. हा प्रकल्प चालवण्यासाठी कोणत्याही परदेशी कंपनीला देण्यास अपनी प्रजाहित पार्टीने विरोध केला आहे. शिष्टमंडळात प्रभारी महापालिका आयुक्त डॉ.विपीन इटनकर, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.गजेंद्र महल्ले यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे महापालिके समोर मोठे आवाहन आहे. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचे डोंगरा सारखे पहाड बनल्या गेले आहेत. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचे तंत्रज्ञान अवलंबण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. बायोगॅस निर्मितीसाठी नुकतेच टेंडर काढण्यात आलं आहे. हे टेंडर देण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विदेशी कंपनीचा विरोध केला आहे. पत्रपरिषदेच्या माध्यमातून अपनी प्रजा हित पार्टीने सांगितले की, विदेशी कंपन्या सोबत करार मान्य केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे पत्रकांराना सांगितले आहे. पत्रपरिषदेला अपनी प्रजा हित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील, विदर्भ राज्य अध्यक्षा ज्योतीताई मेश्राम, तृप्ती नाईक और अरंविद नागदेवे उपस्थित होते.(दि.02 सप्टेंबर 2022)