नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवाचे आयोजन

यावर्षी संस्थेचे सुवर्ण महोत्सवानिमित्त रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी, सकाळी १२ ते ४ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर दिनांक 10 सप्टेंबर :-. ज्योती नागरी सहकारी पतसंस्था इतवारी नागपूर च्यावतीने आज पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष दत्तात्रय वलोकार.यांच्या अध्यक्षतेत पत्रकार परिषद पार पडली. इतवारी येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेला पुर्ण ५२ वर्ष होत आहे परंतु दोन वर्ष कोराना काळातील गेल्यामुळे कार्यकम करण्यास विलंब होत आहे. म्हणून यावर्षी संस्थेचे सुवर्ण महोत्सवानिमित्त रविवार दि. ११ सप्टेंबर रोजी, सकाळी १२ ते ४ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम महाराष्ट्र वैश्य संघ भवन, शिरसपेठ, रेशीमबाग रोड नागपूर येथे आयोजित केलेला आहे. अशी माहीती पत्रकारांना दिली. यावेळी उपस्थित हरिश्चंद्र माकमे, वसंत गुंतीवार, कृष्णराव निमजे, संजय देहलीकर आणि अध्यक्ष दत्तात्रय वलोकार उपस्थित होते.(दि.10 सप्टेंबर 2022)